top of page

धनंजय मुंडे आणि त्यांच्या गुंडांकडून जिवितास धोका !

मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण धनंजय देशमुखांचे जुने पत्र व्हायरल

ree

बीड: परळी नगरपरिषद निवडणुक प्रचारादरम्यान आमदार धनंजय मुंडेनी अप्रत्यक्षरित्या वाल्मिक कराडची आठवण येत असल्याचं जाहीर केलं आणि संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेलं मागील वर्षीचं पत्र सोशल मिडियावर व्हायरल झालं आहे.


संतोष देशमुख यांच्या निर्घुन हत्येतील आरोपी सध्या बीडच्या कारागृहात आहेत. एकून आरोपी पैकी एक कृष्णा आंधळे फरार असून यंत्रणेला अद्याप पर्यंत त्याचा सुगावा लागलेला नाही. खंडणीसह खुनाच्या कटात सहभागी असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे दस्तुरखुद्द धनंजय मुंडे यांनी कबुल केले होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यातच आता परळी नगरपरिषदेच्या निवडणुक प्रचारामध्ये वाल्मिक कराड यांची आठवण आल्याचं जाहिर केलं आणि धनंजय देशमुख यांनी पोलिस अधीक्षकांना जानेवारी 2024 मध्ये दिलेलं पत्र व्हायरल झालं आहे.

धनंजय देशमुख यांनी तत्कालीन पोलिस अधीक्षकांना दिलेल्या पत्रामध्ये धनंजय मुंडे व त्यांच्या गुंड लोकांकडून आमच्या जीवित्वास धोका आहे,


शिवाय साक्षीदारांवर दबाव निर्माण करण्यात येत असल्याचे पत्रात नमुद करण्यात आले आहे. तसेच सदरील प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून इतर आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये असून त्यांचे साथीदार व जेलमधील मुख्य आरोपी वाल्मीक कराड यांचे हितचिंतक व मंत्री धनंजय मुडे यांचे गुंड व त्याचे साथीदार यांच्यापासून माझ्या कुटूंबास व माझ्या केस मधील साक्षीदारावर दबाव तंत्राचा वापर करून त्याचे जिवीतास धोका निर्माण करीत आहेत. तसेच फेसबुकवरती मंत्री धनंजय मुंडे व वाल्मिक कराउ यांचे समर्थक बाजीराव चाटे त्यांचेसह अनेक लोकांनी अश्लिल भाषेत व धमकी वजा सोशल मिडियावरती मजकुर लिहून तो फेसबुकवर पोस्ट व कमेंट करून आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न वेळोवेळी करीत आहेत. अशा अषयाचे पत्र धनंजय देशमुख यांनी पोलिस अधीक्षकांना दिले होते.

ree

परळी नगरपरिषदेच्या निवडणुक प्रचारादरम्यान धनंजय मुंडे यांनी जगमित्र कार्यालय सुरू आहे, त्याचे कामही सुरू आहे. लोकांच्या हितासाठी ते सुरू असले तरी आता आपल्यात एकाची कमी आहे. काय चुक झाली काय नाही ते न्यायालय पाहिल. पण मित्र म्हणून त्याची कमतरतेची जाणीव होते अशा शब्दात वाल्मिक कराड ची आठवण काढली. त्यानंतर धनंजय देशमुख यांनी जानेवारी 2024 मध्ये पोलीस अधीक्षक यांना दिलेलं पत्र सोशला मिडियावर व्हायरल झालं आहे. प्रत्यक्षात धनंजय देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही पलटवार केला.


धनंजय मुंडे यांच्या आठवणीच्या मुद्याने राजकीय वातावरणही तापवलं आहे. त्यांच्याच पक्षातील माजलगाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेवर सडकून टीका केली. आमदार सोळंके म्हणाले की, धनंजय मुंडे यांना जर वाल्मिक कराडची आठवण येत असेल तर त्यांनी सरळ जेलमध्ये वाल्मिक कराडच्या शेजारी जाऊन बसावं.


राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोणवने म्हणाले की, धनंजय मुंडे यांना मित्र म्हणून वाल्मिक कराडची आठवण येत असेल, त्यांनी वाल्मिक कराडच्या बाजूला जेलमध्ये जाऊन बसावं कशाला या फंद्यात पडायचं जाऊन बसायचं वाल्मिक च्या बाजूला.

Comments


bottom of page