धनंजय मुंडेचा मर्डर होणार होता, भय्यू महाराजांनी वाचवले!
- Navnath Yewale
- Dec 3
- 1 min read
आमदार रत्नाकर गुट्टेंचा खळबजनक दावा

बीड: धनंजय मुंडेची हत्या झाली असती मात्र ते वाचले, रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी हा दावा केला आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी गंगाखेडमध्ये जाऊन रत्नाकर गुट्टेंवर सडकून केलेली टीका यास कारणीभूत ठरली आहे. याच टीकेला प्रत्यूत्तर देताना रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडेच्या हत्येबाबत खळबळजनक दावा केला आहे.
धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी परळी येथे जाहीर सभेत आपल्याला राजकारणातूनच नाही तर जीवनातून संपवण्याच कट रचला जात असल्याचा आरोप केला होता. धनंजय मुंडे आणि रत्नाकर गुट्टे यांच्यातील अनेक वर्षापासूनचे वैर लपून राहिलेले नाही. त्यातच रत्नाकर गुट्टेंचा जावई राजाभाऊ फड यांनी धनंजय मुंडेच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारीही केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी गंगाखेडमध्ये जाऊन रत्नाकर गुट्टेंवर जमीन घोटाळ्याचे आरोप केले.
धनंजय मुंडेंच्या आरोपाला प्रत्यूत्तर देतांना रत्नाकर गुट्टेंनी मुंडेंना आव्हान दिलं आहे. त्यामुळे आतापर्यंत अप्रत्यक्षपणे सुरू असलेले मुंडे विरुद्ध गुट्टे संघर्ष आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे. मात्र राजकारणाची सुसंस्कृत परंपरा असलेल्या महाराष्ट्रात राजकारण धनंजय मुंडेंच्या हत्येच्या कटापर्यंत जात असेल तर महाराष्ट्राची राजकीय वाटचाल बिहारच्या दिशेने सुरू झाली का? याचा विचार करायला हवा. एवढंच नाही तर मुंडेंच्या जीवावर कोण उठलंय. याचीही चौकशी करून दुध का दुध आणि पाणी का पाणी करण्याची गरज आहे.



Comments