धनंजय मुंडेच्या हाता केवळ 2-3 महिने ...- करुणा मुंडे
- Navnath Yewale
- 2 hours ago
- 1 min read

करुणा मुंडे यांनी बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार टीका केली.तर मराठी भाषा सक्तीवरही बाजू मांडली. त्याचवेळी त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजकीय जीवनाविषयी धक्कादायक दावा केला आहे. करुणा मुंडे यांच्या या दाव्यसाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
करुणा मुंडे यांनी विविध विषयावर मतं मांडली, त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांना ‘ चॅलेंज करते मी पण ब्राम्हण जातीची आहे. तुमची लायकी काय आहे मी दाखवून देईल. तुम्ही वन टू वन माझ्यासोबत डिबेट मध्ये या, असे खुले आव्हान त्यांनी दिले.
धनंजय मुंडे यांची आमदारकी पुढील 2 ते 3 महिन्यात जाणार असा मोठा दावा करूणा मुंडे यांनी केला आहे. यापूर्वी धनंजय मुंडे हे दुसरे खरात असल्याचा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला होता. महिलांवर जितके अत्याचार खरातने केले, तसेच अर्धे अत्याचार धनंजय मुंडे यांनी केले, चांगल्या पत्नीला सोडून दोन महिलांसोबत संबंध ठेवले, असा खळबळजनक अरोपही त्यांनी केला होता.



Comments