धाराशिवमध्ये हिट अँड रन; 7 ऊसतोड मजूरांना चिरडले, 4 जणांची प्रकृती गंभीर
- Navnath Yewale
- Dec 22, 2025
- 1 min read

धाराशिव : धाराशिवमधील कळंब-लातूर रस्त्यावर हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव कारने 7 ऊसतोड मजुरांना उडवलं आहे. या अपघातात 4 ऊसतोड मजुरांची प्रकृती गंभीर आहे. जखमी ऊसतोड कामगारांना अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. तर कारचा चालक फारार झाला आहे.
मिळालेल्या महितीनुसार कळंब-लातूर रस्त्यावर ही घटना घडली आहे. काही ऊसतोड मजूर शेतातून कळंबच्या दिशेने बाजारासाठी चालत येत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका कारने मजुरांना उडवलं. मजुरांना उडून वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातात 6 मजूर जखमी झाले. जखमी मजुरांना तातडीने अंबाजोगाई शासकीय रुग्णालयाला हलवण्यात आलं. या अपघातात चार ऊसातोड मजूर अत्यावस्थ असल्याची माहिती समोर आली आहे.
ऊसतोड मजूर कळंब तालुक्यातील मंगरूळ गावचे असल्याचं कळतं आहे. घटनेची माहिती मिळताच जखमींच्या कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. कळंब शासकीय रुग्णालयात धाव घेतली. कळंब शासकीय रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. जखमी मजूर सगळे आदिवासी पारधी समाजाचे असल्याचं समोर आलं आहे. अपघाग्रस्त वाहनावर लातूर जिल्ह्यातील पासिंग नंबर असल्यानं वाहन चालक लातूर जिल्ह्यातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. जखमींचा जबाब नोंदवण्यात आला आहे. फरार कारचालकाचा शोध घेतला जात आहे.



Comments