top of page

धारूर आगारातील कर्मचार्‍याची मांजराच्या रॅम्पला गळफास घेवून आत्महत्या

बीड: बीडच्या धारूर आगारात कार्यरत असलेल्या बसचालकाने केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाच्या रॅम्पच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील धनेगाव येथील रहीवाशी आत्मलिंग नामदेव गुजर यांनी शनिवारी (दि.7) सायंकाळी 6:45 च्या सुमारास धनेगाव येथील मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या रॅम्पच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मयत आत्मलिंग गुजर यांचे चुलत भाऊ विश्वनाथ रामलिंग गुजर यांच्या माहितीवरून युसूफवडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार डोंगरे पुढील तपास करीत आहेत.

Comments


bottom of page