धुळे- सोलापूर महार्गावर मांजरसुंबा घाटात डिझेल टँकरचा भिषण स्फोट
- Navnath Yewale
- 7 hours ago
- 2 min read
टँकरला कंटेनरची धडक, भिषण आपघाताने टँकर स्फोट अपघातग्रस्त टँकर आगीच्या भक्षस्थानी; परिसरात धुराचे लोट, काही काळ वाहतुक ठप्प , सुदैवाने जिवितहानी नाही

बीड जिल्ह्यातील धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांजसुंबा घाटाजवळील कोळवाडी फाटा येथे आज (12 डिसेंबर) दुपारच्या सुमारास एका डिझेलच्या टँकरचा भीषण अपघात झाला. पूर्ण क्षमतेने भरलेला हा टँकर उलटल्याने त्याचा स्फोट होऊन आग लागली. ज्यामुळे संपूर्ण परिसरात आगीची प्रचंड लोट उठले. या घटनेमुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी जवळपास दोन ते अडीच किलोमिटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या .
डिझेल घेऊन जाणार्या टँबरला कंटेनरने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आणि त्यामुळच आगीचा प्रचंड भडका झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, टँबर उलटतास त्यातून डिसेल गळू लागले आणि काही क्षणातच स्फोट होऊन आग भडकली. आगीने इतके रौद्ररुप धारण केले की, लगतच्या गायरान जमिनीवरील झाडे आणि वसन्सतींनाही या आगीचा फटका बसला. परिसरातील झाडांसह काही पक्षी, जीव जंतू आगीच्या भक्षस्थानी पडले, धुराचे लोट अवकाशात पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मांजरसुंबा घाट हा डोंगराळ आणि वळणावळणाच भाग असल्याने येथे अपघाताची शक्यता नेहमी असते. अपघातानंतर तात्काळ वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजूच्या वाहनांना थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली मात्र, आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला घटनस्थाळी पोहोचण्यास विलंब झाल्याने आगीने आणखीच रौद्ररुप धारण केले होते.
डिझेलमुळे आग आटोक्यात आणण्यात मोठी अडचण येत असल्याचे पोलिसांनी सांगितले, “ डिसेलचा टँकर पूर्ण भरलेला असल्याने आग भडकण्यास वेळ लागला नाही. आम्ही प्रयत्न करत आहोत, पण डिझेलच्या गळतीमळे आग नियंत्रणात आणणे कठीण जात आहे. असे एका पोलिस अधिकार्याने सांगिले. आग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.
या अपघातामुळे धुळे-सोलापूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. काही वेळ प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये भीती निर्माण झाली होती. दरम्यान काहींनी घटनास्थळापासून दूर राहण्यासाठी पर्यायी मार्ग शोधला. बीड पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे . टँकरच्या मालकाची माहिती घेण्यापासून अपघाताचे कारण स्पष्ट झाल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
परिसरातील रहिवासी म्हणाले की या घाटात अपघाताच्या घटना वारंवार घडतात, मात्र आजच्या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे “ आग इतकी भीषण होती की, दूरवरुनही धूर दिसत होता. आम्ही घाबरुन गेलो” असे एका स्थानिक शेतकर्याने सांगितले या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र चालक आणि व्लिनर यांचा शोध घेण्यात येत आहे. बीड जिल्हा प्रशासनाने या घटनेची गांभीर्याृने दखल घेतली असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात अशा अपघाताच्या घटना टाळण्यासाठी घाटातील रस्त्यांची दुरुस्ती आणि सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.



Comments