top of page

नंदुरबारच्या अमली बारी घाटात स्कूल बसला भिषण अपघात, बस 200 फूट खोल दरीत कोसळली


नंदुरबार: अक्कलकुवा तालुक्यातील अमली बारी घाटात स्कूल बसचा भीषण अपघात झाला. विद्यार्थ्यांना घेवून जाणारी बस थेट 200 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


मिळलेल्या माहितीनुसार, हे विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील अनुदानित आश्रम शाळेतील होते. शाहेची बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अपघात घडला. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी मेहुणबारे येथील शाळेची बस मोलगीहून अक्कलकुवाच्या दिशेने जात असतानाच अपघात घडला.


अपघातग्रस्त स्कूल बसमध्ये अंदाजे 40 ते 45 विद्यार्थी असल्याची माहिती आहे. अमली बारी घाटातील तीव्र वळणावर वाहनावरील ताबा सुटल्याने बस थेट 200 फूट खोलदरीत कोसळली. या भिषण अपघातात बसचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यात आले.

नंदूरबार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली आहे. हा भीषण अपघात नेमका झाला कसा? बस 200 फूट दरीत कोसळली कशी? याचा तपास सुरू आहे. हा अपघात नेमकं कोणत्या कारणाने झाला? या कारणमिमांसाने पोलिस तपास करत आहेत. बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर नंदूरबारच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments


bottom of page