नरसापूर अत्याचारातील नराधम आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी पॉझिटिव्ह
- Navnath Yewale
- 16 hours ago
- 2 min read

पुणे: पुण्यातील नरसापूर अत्याचार प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला आहे. सर्वत्र संतापाची लाट उसळली असून आरेापीला कठोर फाशीची द्यावी, शिवाय एन्काऊंटर करावा अशी मागणी केली जात आहे. आरोपी नराधमाच्या लैंगिक क्षमता चाचणी पॉसिटिव्ह आला आहे. संपूर्ण रिपोर्टपाहून पोलिसही हादरले आहेत. आरोपीनं त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर दुसरीकडे शनिवारी कार्टात अजब दावा देखील केला होता. त्याच्या या दाव्यावनंतर तो किती विकृत आणि क्रूर आहे हे लक्षात येते.
नरसापूर अत्याचारातील आरोपी भीमाजी कांबळे याची लैंगिक क्षमता चाचणी पॉजिटिव्ह आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. नराधमाने अत्याचारावेळी चिमुकलीच्या तोंडात बोळा कोंबून तिला गप्प केले होते. अत्याचारावेळी झटापटीत चिमुकलीचा एक हातही पिरगळून तुटल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांकडून नराधमाविरोधातील सर्व पुरावे गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नसरापूरच्या तपासकामी पुणे ग्रामीण एसपी संदिप गिल स्वत: बारीक लक्ष ठेऊन आहेत. पुणे ग्रामीण एलसीबीच्या सिनिअर पोलिस निरिक्षक विजयमाला पवार तपास अधिकारी आहेत. पुढील रिमांड कॉपीत आरोपींची यापुर्वीच्या गुन्ह्यांचाही पोलिसांनी समावेश केला आहे. दरम्यान, शनिवारी पीडीत मुलीचं इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आलं.
शनिवारी मयत चिमुकलीचे पुण्याच्या ससून रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आलं.त्यानंतर याच प्राथमिक अहवाल पोलिसांकडे देण्यात आला. त्यामुळे अंतिम अहवाल आल्यानंतरच चिमुकलीच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. चिमुरडीवर अत्यंसंस्कार देखील करण्यात आले. यानंतर तिच्या वडिलांनी संताप व्यक्त करत न्याय मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तीनं आमच्या कुटुंबाला भेटायला येऊ नये अशी भावना व्यक्त केली.
क्रूरकर्मा भीमाजी कांबळेची धक्कादायक कबुली: नसरापूर अत्याचार प्रकरणात क्रूरकर्मा भीमाजी कांबळेंनी एकीकडे त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर दुसरीकडे त्यानं निर्लज्जपणाचा कळस गाठत कोर्टात अजब दावाही केला. शुक्रवारी 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाख आरोपीला फाशीच्या शिक्षेच्या मागणीसाठी पुण्यात नागरिकांनी रस्त्यावर उतरुन तिव्र आंदोलन केले. आरोपीला कठोर फाशीच्या शिक्षेची मागणी होत आहे. तर दूसरीकडे आरोपीचा निर्लज्जपणा समोर आला आहे. एवढा क्रूरपणा करूनही किरकोळ मारामारीसाठी अटक केल्याचा आजब दावा क्रूरकर्मा नराधम आरोपीने केला.
आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर त्याचा निर्लज्जपणा समोर आला. मला किरकोळ मारामारीसाठी अटक केल्याचा अजब दावा आरोपीने कोर्टात केला. तुमचं प्रकरण काय आहे? तुम्हाला माहिती आहे का? कोर्टानं आरोपीला विचालं. ही मारामारीची किरकोळ केस असल्याचं आरोपीनं सांगितलं. दरम्यान, या प्रकरणात कोर्टानं पोलिसांना देखील झापलं, रिमांड कॉपीमध्ये जुने गुन्हे न टाकल्यानं कोर्टाने नाराजी व्यक्ती केली. त्यानंतर कोर्टानं पोलिसांनी 15 मिनिटं दिले, त्यानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी बदलण्यात आली.
नराधमानं कोर्टात अजब दावा केला असला तरी आज पोलिसी खाक्या मिळाल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती आहे. चिमुकलीला खाऊ देतो आणि वासरू दाखवतो असं सांगून गोठ्यात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केल्याचं या क्रूरकर्मानं सांगितलं, त्यामुळे त्याला तात्काळ फाशी देण्याची मागणी होत आहे. तसंच शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीचीही मागणी जोर धरू लागली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगानं देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात कडक कारवाईचे आदेश महिला आयोगानं दिले आहेत. तर दुसरीकडे आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्याची अशी शिफारस करणार असल्याचं राज्य बाल हक्क आयोगानं सांगितलं आहे.
कायद्याचा धाक निर्माण व्हावा यासाठी पोलिसांनी आणि सरकानं प्रयत्न करावेत असं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. पीडित मुलीच्या वडिलांच्या अवाहानानंतर राजकीय नेत्यांनी त्यांचा भोरचा दौरा रद्द केला आहे. माधुरी मिसाळ आणि मनोज जरांगे यांनी नसरापूरचा दौरा रद्द केला आहे.
तर दुसरीकडे आरोपीला या प्रकरणात पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच त्याला तात्काळ फाशी देण्यात यावी अशीही मागणी होत आहे. त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार का? याशिवाय आरोपीवर कोणती करावाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



Comments