नवी मुंबईत अप्पर जिल्हाधिकारीच एसीबीच्या जाळ्यात; 22 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
- Navnath Yewale
- May 14
- 1 min read

नवी मुंबई: राज्यात गेल्या काही महिन्यात एसीबीने कारवाईचा धडाका लावला आहे. शिपायापासून तहसीलदार, अप्पर जिल्हाधिकार्यापर्यंतच्या अधिकार्यांना लाच घेताना अटक केली आहे. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असली तरी लाच घेण्याचं सुरूच असल्याचं चित्र आहे. दुसरीकडे एसीबीने कारवाई करत धाडसत्र सुरूच ठेवल्याचं आज पुन्हा एकदा समोर आलं आहे. नवी मुंबईतील सिडको येथे थेट अप्पर जिल्हाधिकार्यास 22 हजार रुपयांची लाच घेताना एसीबी पोलिसांनी अटक केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवी मुंबईत लाचप्रकरणात मोठी कारवाई केली असून सिडकोच्या भूमी व भूमापन अधिकार्याला अटक करण्यात आली आहे. अप्पर जिल्हाकिधारी रामदास जगताप यांना 22 हजार रुपयांची लाच धेताना एसीबीच्या अधिाकर्यांनी रंगेहाथ पकडले. रामदास जगताप याला सिडको कायासृलयातच रंगेहाथ अटक करण्यात आल्याने सिडकोसह प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे नवी मुंबई एसीबीकडून आप्पर जिल्हाधिकार्यांविरुद्ध अटकेची कारवाई करण्यता आली असून या कारवाईने प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.
पुणे शहर पोलीस दलातही लाचप्रकरणात एका महिला अधिकार्यास एीसबीने अटक केल्याची घटना 10 दिवसांपूर्वी समोर आली होती. या घटनेनं पोलीस दलात खळबळ उडाली. पुणे पोलिस आयुक्तालयात एका महिला पोलिस अधिकार्यास तब्बल 28 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. वैशाली तोटेवार असे या महिला सहाय्यक पोलीस निरिक्षकाचे नाव असून, त्या पुणे आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होत्या. थेट पोलीस आयुक्तालाच्या परिसरात ही कारवाई झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.



Comments