top of page

नवीन वर्षाच्या सुरुवातीला जम्मु-काश्मिरमध्ये हल्ल्याची शक्यता ! तीन जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट; सीमेपलीकडून दहशवादी घुसखोरीच्या तयारीत

जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा कट रचत आहेत. ते ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काळात कठुआ, सांबा आणि उधमपूर जिल्ह्यात अशांतता निर्माण करू शकतात, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.


सांबा आणि कठुआ जिल्ह्यांच्या सीमेवर, गस्त वाढवण्यात आली आहे. या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातून दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे ज्ञात आहे. सुरक्षेसाठी पंजाब पोलिसांनाही तैनात करण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणांनी बीएसएफ, लष्कर आणि पोलिसांना सतर्क केले आहे.


25 डिसेंबरपर्यंत विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आयएसआयने या काळात घुसखोरीसाठी दशहवाद्यांना लक्ष्य दिले आहे. घुसखोरीनंतर, दहशतवादी कठुआ, सांबा आणि उधमपूरमध्ये हल्ले करू शकतात किंवा सुरक्षा प्रतिष्ठानांना लक्ष्य करू शकतात.


मंगळवारी बीएसएफने पंजाब पोलिसांसह बामियाल आणि पठाणकोट अंतर्गत येणार्‍या सिम्बल कोलियन गावांच्या खोल भागात आणि कठुआमधील उज्ज नदीच्या काठावरील पिंडी पारोलियन गावात संयुक्त शेाध मोहिम राबवली. अनेक संशयित भागात शोध घेण्यात आला आणि संशयितांची चौकशी करण्यात आली.


दरम्यान, अनेक संशयितांच्या घरांचीही तपासणी करण्यात आली. स्थानिकांना कोणत्याही संशयित व्यक्ती किंवा संशयास्पद हालचालींबद्दल त्वरित माहिती देण्यास सांगण्यात आले, जेणेकरून वेळेवर कारवाई करता येईल. सोमवारी हिरानगर परिसरातील एका स्थानिक तरुणाने दोन संशयितांना शस्त्रे आणि गणवेशासह इतर वस्तू घेऊन जाताना पाहिले होते.


तेव्हापासून संपूर्ण परिसरात सतत शोध घेतला जात आह . पठाणकोट, कठुआ आणि सांबा सीमेवर सतत गस्त घातली जात आहे. प्रत्येक घुसखोरावर लक्ष ठेवले जात आहे. दहशतवादी घुसखोरी करू नये यासाठी बीएसएफ आणि पोलिस दहशतवाद्यांच्या जुन्या मार्गांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

Comments


bottom of page