top of page

नांदेडमध्ये काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीची युतीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी; 50-50 चा फॉम्यूला ठरला


नांदेड : जिल्ह्यातील 13 नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या ऐतिहासिक आघाडीची घोषणा करण्यात आली. ही घोषणा खासदार रविंद्र चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली या वेळी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या आघाडीचा पाया 50-50 या तत्वावर आधारित असून, दोन्ही पक्षांनी स्थानिक स्तरावर जनहित, समाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.


आघाडी संदर्भातील जागावाटप व रणनीतीसंबंधी चर्चा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार वंचितच्या राज्य समितीमार्फत जिल्हा स्तरावरील टीमच्या माध्यमातून पार पडली.चर्चेनंतर ठरविण्यात आले की तुर्तास 13 नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसाठीही परस्पर करून निर्णय घेण्यात येईल.


दरम्यान, दोन्ही पक्षाच्या वतिने संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. वंचित आघाडीने ठाम भूमिका मांडली की 2 सप्टेंबर 2025 च्या शासन निर्णयावर न्यायालयीन निर्णय येईपर्यंत, ओबीसींच्या राखीव जागा फक्त जुण्या ओबीसींनाच दिल्या जाव्यात. ही मागणी शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेने अधिक बळकट झाली असून, दोन्ही पक्षांनी सामाजिक समतेच्या भूमिकेला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments


bottom of page