top of page

नांदेडमध्ये गँगवारमधून तिहेरी हत्याकांड; सदा देशमुख गँग-अनिल पंजाबी टोळी वैर धुरंधर 2 पाहून ई-स्क्वेअरमधून बाहेर आला अन्..., भावाने शासकीय रुग्णलाय गाठून बदला घेतला

नांदेड: शहरात गँगवॉरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली असून, या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारी वर्चस्वाच्या वादातून शहरातील ई-स्क्वेअर परिसरात आणि त्यानंतर थेट शासकीय रुग्णालयात रक्ताचा खेळ खेळला गेला. या हिंसक घटनेची सुरुवात शहरातील कॅनाल रोडवर असलेल्या ई-स्क्वेअर परिसरात झाली. येथे काही अज्ञात हल्लेखोरांनी पूर्ववैमानस्यातून अर्जितसिंघ गजानन चव्हाण याच्यावर अचानक हल्ला चढवला. धारदार शस्त्रांनी केलेल्या या भीषण हल्ल्यात 25 वर्षीय अर्जितसिंघ चव्हाणचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यावेळी अर्जितसिंघ चव्हाण हा धुरंधर 2 चित्रपट पाहण्यासाठी आला होता, मात्र हल्लेखोरांनी त्याला आणि त्याच्या दोन साथीदारांना घेराव घालून हे कृत्य केलं.


नांदेडमध्ये तिहेरी हत्याकांड जरी घडलं असलं तरी याला पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्तीची असल्याचे पोलीस तपासात निष्पन्नद झाले आहे घटनेमधील हल्लेखोर आणि मयत असलेला अर्जितसिंघ चव्हाण यांच्यावर देखील गंभीर स्वरुपाची गुन्हे दाखल आहेत अर्जितसिंघ चव्हाण याच्यावर नऊ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले अर्जित हा धुरंदर टू चित्रपट पाहण्यासाठी ई-स्क्वेअर ला रात्री गेला होता पहाटे सव्वा एक वाजता चित्रपट संपल्यानंतर तो घरी जाताना त्याच्यावर हल्ला करत त्याला तिथेच मारलं.


हल्ल्यामध्ये साईलाला हा अनिल पंजाबी याचा म्होरक्या होता, अनिल पंजाबी जेलमध्ये गेल्यानंतर तेव्हापासूनच गँग लीडरच्या भूमिकेत साईलाला त्याची गँग चालवत होता, साईलाला वर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत एमपीडीएची सुद्धा त्याच्यावर कारवाई होती सदा देशमुखचा खून हा साईलालानेच केला होता, असा संशय अर्जितसिंघ चव्हाण याला होता तेव्हापासूनच अर्जितसिंघ चव्हाण हा साईलालाच्या मागावर होता, अर्जितसिंघ चव्हाण हा देशमुखच्या गँगचा मेंबर होता.


अर्जितसिंघ चव्हाण सोबत संभाजी पाटील व नागेश्वर लडे हे होते तर साईलालाच्या गँगमधून अरबाज व आवेश हे समोरा समोर येत तलवार व खंजीराने एकमेकांवर वार करत अर्जितसिंघ चव्हाणला जखमी केले व त्यातच त्याचा मृत्यू झाला. अर्जितसिंघ चव्हाणवर झालेला हल्ला पाहता अर्जितसिंघ चव्हाणसोबत असलेल्या संभाजी पाटील व नागेश लडे यांनी अरबाज आणि आवेशवर हल्ला चढवला त्याला मारले, अरबाजचा मृत्यू हा जागेवरच झाला आवेशचा मृत्यू हा शासकीय रुग्णालयात झाला, आवेश इकडे आल्याची माहिती अर्जितच्या भावाला मिळाली आणि त्याने शासकीय रुग्णालयातच आवेशवर खंजिराने वार करत त्याच्यावर हल्ला केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळ्या एकमेकांसमोर उभ्या राहिल्या आणि या टोळी युद्धातचे या तिघांचाही रक्तरंजित काहाणीने अंत झाला.

Comments


bottom of page