नागपूर हिवाळी अधिवेशनावर आंदोलनातील महिलेचं टोकाचं पाऊल
- Navnath Yewale
- 7 hours ago
- 1 min read

नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान एका आंदोलनकर्त्या महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशानावेळी धरणे आंदोलनात एका महिलेनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यशवंत सीताबाई धांडे असं आत्मदहनाचा प्रयत्न करणार्या महिलेनं नाव आहे. नागपूरमधील यशवंत स्टेडियम परिसरात ही घटना घडली. आदोलन करणार्या महिलेनं आत्मदहन केल्यानं पालिस दलाची मोठी तारांबळ उडाली.
यशवंत स्टेडियम परिसरात पुण्यातील खराडी- चंदन नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी आंदोलन करण्यात येत होते. बोगस संमतीपत्रावर बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. यासह विकासकामात लावलेल्या आगीत 100 झोपड्या जळाल्याने आंदोलक आक्रमक झाले होते. 23 एप्रिल 2025 च्या पुण्यात लागलेल्या आगीत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता, मात्र बिल्डरवर अद्याप गुन्हा दाखल न केल्याचा आंदोलनकांचा आरोप आहे.
राजकीय दबावामुळे बिल्डरला अटक होत नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे महिलांनी नागपूरात येऊन आंदोलन केलं. मात्र, सरकारकडून कोणती कारवाई होत नसल्याचं आंदोलक करणार्या सीताबाई धांडे यांनी रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला. आत्मदहानाचा इशारा देताना त्यांनी रुमाल जाळला. त्यावेळी पोलीस कर्मचार्यांनी धाव घेतली आणि अनर्थ टळला.



Comments