नागपूरमध्ये सोयाबीनला मिळाला 8,000 रुपयाचा विक्रमी दर चढउतार कायम, भाव आणखी कडाडणार?
- Navnath Yewale
- Dec 3
- 2 min read

नागपूर: राज्यातील सोयाबीन बाजारात मागील दोन दिवसांपासून दरांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही बाजार समित्यांमध्ये दर स्थिर राहिले असले, तरी अनेक ठिकाणी आवक वाढणे, दर्जानुसार दर ठरणे आणि स्थानिक मागणीतील फरक यामुळे भावात अस्थिरता दिसून आली. 2 आणि 3 डिसेंबर रोजी नगापूरमध्ये सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला तर लासलगाव, अमरावती, जळगावसह काही बाजारामध्ये दर तुलनेने कमी राहिले.
आज 3 डिसेंबर रोजी नागपूर बाजारात लोकल सोयाबीनचे दर 8,000 ते 7,200 रुपयांपर्यंत गेले असून सरासरी दर 8,150 रुपये नोंदला गेला. हा दर राज्यातील सर्व बाजारपेठांमध्ये सर्वाधिक आहे. कमी आवक (फक्त 3 क्किंटल) आणि चांगल्या प्रतीचे सोयाबीन मिळाल्याने दरात वाढ झाल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे.
तर दुसरीकडे जळगाव-मसावत येथे 3 डिसेंबरला सोयाबीनचा दर 3, 950 रुपये इतका राहिला. आवक 34 क्किंटल इतकी होती. तर मुरूम बाजारात पिवळ्या जातीची आवक 49 क्किंटल असून दर 4, 212 ते 4,432 रुपयांदरम्यान राहिला. सरासरी भाव 4, 337 रुपये नोंदला गेला.
दरात चढ-उतार स्पष्ट:
लासलगाव आणि विंचूर बाजारात 2 डिसेंबरला जवळपास 1,500 क्किंटल जवळपास आवक झाली. मात्र, दर 3,00 ते 4,530 रुपयांदरम्यान राहिले. सरासरी दर 4,450 रुपयांच्या आसपास स्थिर होता. मोठ्या आवकीमुळे दरात गडगडाट दिसून आला.
छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, राहुरी-वांबोरी, मनोरा, सोलापूर, कोपरगाव, अकोला, यवतमाळ, बार्शी- टाकळी, बुलढाणा, औराद शहाजानी, मुखेंड, सेनगाव आदी बाजारामध्ये दर साधारण 4,000 ते 4,600 रुपयांच्या श्रेणीत राहिले. काही बाजारांमध्ये दरात जास्तीत जास्त 4,720 रुपये (बाभुळगाव) तर किमान 3,000 रुपये (बाभुळगाव, आष्टी) असे दर नोंदले गेले.
लातूरमध्ये 7,211 क्किंटल अशी मोठ्या प्रमाणात आवक झाली. दर 3,850 ते 4,320 रुपये तर सरासरी 4,400 रुपये नोंदवला गेला. या भागात स्थानिक चिंधी बाजार, तेल गिरण्यांची मागणी आणि चांगल्या प्रतीच्या सोयाबीनमुळे दर समाधानकारक आहेत. जालनामध्ये 7,355 क्किंटल आवक असून दर 3,800 ते 5,300 रुपये इतका मोठा फरक दिसून आला. सरासरी दर 4,425 रुपये राहिला.
सध्याची स्थिती : राज्यातील सोयाबीन बाजारभाव सध्या 3,000 ते 8,200 रुपयांच्या दरम्यान आहेत. कमी आवक व चांगल्या प्रतीच्या मालाला मोठी मागणी असल्याने काही ठिकाणी दर वाढले, तर मोठ्या आवकीच्या बाजारात भाव स्थिर किंवा घसरलेल दिसत आहेत.



Comments