top of page

नालासोपार्‍या विरार दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली, नागरिक जीव मुठीत घेवून धावले.


गेल्याच आठवड्यात विरारमध्ये एक चार मजली इमारत कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला होता, तर 9 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेच्या जखमा ताज्या असताना आता नालासोपारामध्ये मोठी घटना घडली आहे. नालासोपारामध्ये इमारत कलंडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरीकांनी जीव मुठीत घेऊन धाव घेतला आहे. सध्या संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण आहे.


नालासोपारा पुर्वेचा प्रगती गर परिसरात पतिसार येथील सितारा बेकारीजवळील सबा अपार्टमेंटचा एक भाग अचानक कलंडल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच नागरीकांंनी जीव मुठीत धरून धाव घेतली आहे. त्यामुळे परिसरात एखच खळबळ उडाली आहे.


खरं तर सुमारे 20 वर्षे ही जुनी इमरात होती. इमरातीचा भाग कलंडल्याने परिसरात नागरीकांची मोठी धावपळ झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून संपूर्ण इमारत रिकामी केली. नागरिकांनी घाईघाईने आपले घरगुती सामान बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

वसई- विरार महानगरपालिका, पोलिस, तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून पुढील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, जुन्या आणि धोकादायक इमरातींबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना थोडक्यात टळली आहे. त्यामुळे विरारची पुनरावृत्ती होण्यापासून थोडक्यात बचावली आहे.


विरार इमारत दुर्घनेप्रकरणी चौघांवर कारवाई

विरार पूर्वे कडील विजय नगर येथील रमाबाई आपार्टमेंट इमारत दुर्घटने प्रकरणी तपास आता गुन्ह ेशाखा युनिट 3 कडे सोपवण्यात आला आहे. यापूर्वी बांधकाम व्यावसायिक नित्तल साने (वय 48) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर, तपास गुन्हे शाखरा युनिट 3 कडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी आता मूळ भूखंड मालक, आणि मेंटेनन्स वसूल करणारे परशुराम दळवी यांच्या दोन मुली - शुभांगी भोईर (वय 38) आणि संध्या पाटील (वय 35) तसेच सुरेंद्र भोईर (वय 46) आणि मंगेश पाटील (वय 35) यांना अटक केली आहे. या सर्वांना वसई सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 6 दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Comments


bottom of page