top of page

भाजपनेते प्रसाद लाड जरांगे पाटील यांच्या भेटीला; आमदार लाड यांची मोठी घोषणा

जालना: भाजपनेते आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी (दि.19) अचानक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आंतरवाली सराटी येथे जलरांगे पाटील यांच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे पाटील यांनी उपोषणावेळी दिलेल्या अश्वासनावर चर्चा करत प्रश्नांची सरबत्ती केली.


आंतरवाली सराटीत आमदार प्रसाद लाड यांच्या स्वागतानंतर जरांगे पाटील आणि प्रसाद लाड यांच्यात चर्चा झाली यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, शाळा महाविद्यालयात प्रवेशासाठी 100% फी घेतली जात आहे. म्हणजे सकरारी आदेश काढला असताना असं का? म्हणजे शासन फक्त नावाला जीआर काढताय का? सरकार जर आदेश काढत असेल तर अधिकार्‍यांना त्रास काय? असा सवाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना केला. आम्हला सवलती कधी लागू होणार, फी भरल्यावर काय अर्थ असणार आहे? की तुम्हीच अधिकार्‍यांना तसे आदेश देताय का? अशा प्रश्नांची सरबत्ती जरांगे पाटील यांनी केली.


प्रसाद लाड यांच्या वर प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर लाड यांनी जरांगे पाटलांच्या प्रश्नांना उत्तर देताना मोठी घोषणा केली. लाड म्हणाले की , कायद्यांची जे अधिकारी अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू . शिवाय मुख्यमंत्र्यांना भेटून मी हा विषय कानावर घालतो. सोबतच ज्यांनी शालेय फी भरली असेल त्यांना त्यांची फी परत देऊ, तसेच मराठा उपसमितीच्या बैठकीत या संदर्भात चर्चा करू. किंबहूना सोमवारपर्यंत सर्व शाळा महाविद्यालयांना या संदर्भात आदेश पारित करू. असे अश्वासन प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांना यावेळी दिेले.


पुढे बोलताना आमदार प्रसाद लाड म्हणाले माझ्या शब्दावर जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतले. त्यासाठी मी आभार मानतो. पण इथून पुढे त्यांनी आंदेालन करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली. अंतरवाली सराटीमध्ये भेटीनंतर प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. मनोज दादांनी उपोषणाला बसू नये ही विनंती मी त्यांना केली होती. त्यांच्या तब्यतीची काळजी होती, त्यांंनी आमच्या शब्दावर उपोषण मागे घेतले. सरकारने जेवढे फास्ट जीआर गेल्या 15 दिवसात झाले ते आजवर कधीच झाले नाही. मी सेतू बनण्याचे काम केले. एमआयडीसी मध्ये नोकरी विषयक तत्काळ परिपत्रक काढण्यात आले. आंदोलनातील मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली आहे. माझ्या मराठा बांधवांना दादांच्या प्रयत्नाने मदत झाली आहे. आता आम्ही एसओपी बनवावी ही मागणी होती, ती आम्ही त्यांना दाखवून बनवली. तर हैदराबाद गॅझेट बाबत प्रमाणपत्राच्या व्हॅलेडिटीसाठी काही नियमावली बनवली आहे. आचारसंहिता 22 तारखेपर्यंत आहे. त्याची काही दिवस अडचण आहे.


1 तारखेपासून 614 अर्ज आले आहेत, शिंदे समितीची मुदत वाढ देखील आम्ही दिलेली आहे. 58 लाख नोंदीची आम्ही हार्ड डिस्क त्यांना देणार आहोत. तो डेटा आहे, त्यावर एक कक्ष काम करत आहेत. कोणत्याही अधिकार्‍यांनी शुक्राचार्य बनन्याच काम केल्यास त्याला आम्ही सोडणार नाहीत. असा सज्जड दमही आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी दिला आहे. सर्व समाज आमच्यासाठी सारखे आहेत. मला उपसमितीचे निमंत्रण आहे, सदस्य म्हणून सहभागी व्हावे, असं सांगण्यात आलं आहे. 964 पैकी 902 गुन्हे मागे घेण्याचे काम केले आहे. ऑफ द रेकॉर्ड काही कामे मला मुलांनी इथे आल्यावंर सांगितले. आज दादा बरोबर बसून मी जेवण करणार असल्याचंही ते म्हणाले.


आपण सातत्याने मदत करणार आहोत. मुख्यमंत्री अतिशय पॉझिटिव्ह काम करत आहेत. स्वतंत्र मराठा कक्ष स्थापन करण्याचे काम होणार आहे. माझ्याकडून काही काम करत असताना चूक झाली असेल तर मी माफी मागतो. मागच्या आंदोलनात जो अपघात झाला, त्याला देखील मदत करण्याचं काम झाले, भरीव आर्थिक मदत केल्याचंही ते म्हणाले.

Comments


bottom of page