top of page

नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरण: धर्मांतरच नाहीतर, पीडितेचे नांव बदलण्याचाही प्रयत्न;एसआयटी तपासात निदा खानची पोलखोल

नाशिक: नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणी मुख्य संशयित निदा खान हिची विशेष तपास पथकाकडून सखोल चौकशी सुरू आहे. या चौकशीत अनरेक धक्कादायक बाबी समोर येत असून पीडित तरुणीवर मानसिक आणि धार्मिक प्रभाव टकाण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासातून उघड होत आहे.


तपासानुसार निदा खान हिने पिडितेचे मूळ नाव बदलून ‘हानिया’ ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा अरोप आहे. यासाठी पिडितेला धार्मिक विषयांशी संबंधित तब्बल 171 लिंक्स पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या माध्यमातून पीडितचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.


एसआयटीच्या तपासात निदा खान पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी करत असल्याचेही समोर आले आहे. पीडितेला विशिष्ट प्रार्थना करण्यास सांगणे, धार्मिक शिक्षण देणे आणि ठराविक प्रकारचे कपडे वापरण्यासाठी दबाव टाकल्याचे आरोप तपासात पुढे आले आहेत.


दरम्यान, 26 मार्चपासून फरार असलेल्या निदा खानला 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. ती ज्या फ्लॅटमध्ये लपून राहत होती, तो फ्लॅट तिच्या नातेवाईकांचा नसून एमआयएमशी संबंधित नगरसेवकं मतीन पटेल यांनी उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे.


निदा खान फरार असताना तिला आर्थिक मतद आणि अन्य सुविधा कोणी पुरवल्या, याचाही तपास सुरू आहे. तिच्यापर्यंत एमआयएमच्या नगरसेवकांचा संपर्क कसा झाला? याचवा एसआयटी शोध घेत आहे. फरार असताना तिच्यासोबत आई-वडील आणि मावशीही राहत असल्याची माहिती समोर आली आहे.


निदा खानची पोलीस कोठडी सोमवारी संपत असल्याने तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्याता आले प्रकरणाचे गांंभीर्य आणि तपासातील प्रगती लक्षात घेता, पोलिसांकडून कोठडी वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.


निदा खानचा मोबईल फोन क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. मोबाईलमधून डिलिट करण्यात आलेले मेसेज, व्हिडिओ आणि संपर्क क्रमांक पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कॉल डिटेल्स्, लोकेशन हिस्ट्री आणि फरारी काळातील हालचालींचाही एसआयटीकडून तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.


अन्य संशयितांचीही होणार चौकशी : या प्रकरणातील अन्यद संशयित दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यासंनाही एसआयटी ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. तिघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार असून, त्यातून आणखी महत्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

Comments


bottom of page