top of page

नाशिकमध्ये युती आधिच मनसे, शिवसेनेत राडा; पदाधिकारी बैठक सोडून निघून गेले

ree

राज्यात शिवसेना- मनसे युतीसंदर्भात चर्चा सुरू आहे नेमकं काय होणार यासंदर्भात वेगवेगळे आंदाज लावले जात आहेत. त्यातच आता नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधील वाद उफाळून आला आहे. मनसे शिवसेना युतीच्या बैठकीत गटबाजीचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. वाद इतका वाढला की ठाकरेंच्या नेत्याने बैठकीतून काढता पाय घेतला.

ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे आणि ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्यात हा वाद झाला. विधानसभा निवडणुकीत वसंत गीते उमेदवार असताना प्रचाराचा मुद्दा जयंत दिंडे यांनी उपस्थित केला. एमडी ड्रग्स विषय लोकांपर्यंत व्यवस्थित न पोहोचल्याने गीते यांचा परभव झाला अस जयंत दिंडे म्हणाले. मात्र, यावर विनायक पांडे यांनी आक्षेप घेत तस असतं तर गीते यांना एवढे मतदान झालं असते का? असा सवालही त्यांनी विचारला.


विनायक पांडे आणि जयंत दिंडे यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. आम्ही इतके वर्ष पक्षात आहोत ते उगाच का? असं म्हणत विनायक पांडे तडकाफडकी बैठक सोडून निघून गेले. विनायक पांडे यांच्या मागोमाग पांडे समर्थक देखील बैठक सोडून निघून गेले. बैठकीनंतर जयंत दिंडे यांनी सांगितलं की, “ आमच्यात काहीच वाद झाला नाही. आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत. हा गैरसमज पसरवू नका” उपनेते दत्ता गायकवाड म्हणाले की, हे शहर देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेेतले होते. स्मार्ट सिटीच्या नावाखाली भकास झालं. गांजा ड्रग्ज, खून, हनी ट्रॅप बाबत शेाध घेतला जात नाही. आम्ही याबाबत वाचा फाडणार, जिल्ह्यात संयुक्त बैठक घेणार आहोत. शहरावर अन्याय होतो आहे, त्यावर आमचे दोनच पक्ष लक्ष घातलीत. आम्ही राजकारण करत नाही, शिवसेनेचा जन्म राजकारणांसाठी नाही. सामान्य लोकं काय सांगतायत बघा. खड्डामुक्त शहरासाठी आंदोलन केले. निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन आंदेालन नाही. 100 पारचा नारा देऊन त्यांना उमेदवार मिळत नाही. काही वाद झाला नाही, गैरसमज निर्माण झाला असेल”


“ किरकोळ वाद झाला ड्रग्जचाच मुद्दा आता आम्हाला घ्यायचा आहे, हनी ट्रॅपचा मुद्दा आहे. भाषणात काय बोलले माहिती नाही, काहीच गैरसमज नाही. आम्ही एकत्र का आलो? शहराची काय अवस्था झाली आहे. मुंबईत एकत्र आलो तर हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेतला आम्ही शहरासाठी एकत्र आलो आहेे निवडणूकीसाठी एकत्र आलो नाही ” असंही ते म्हणाले.

मनसे पदाधिकारी दिनकर पाटील म्हणाले की, “ मनसे आणि शिवसेना यांच्यात बैठक झाली. जनतेवर अन्या होतो त्यावर आमची चर्चा झाली. यापुढे आम्ही मोर्चा काढणार, कायदा सुव्यवस्थेबाबत आम्ही मोर्चा काढणार. विभाग आणि तालुक्यानुसार आम्ही एकत्रित बैठका घेणार. एकत्रित मोर्चा काढणार आणि सरकारला जाब विचारणार. आमचे वरिष्ठ नेते यामध्ये सहभागी होतील. 15 दिवसानंतर मोर्चा काढून आमचं सगळं काही एकत्रित राहणार महायुतीचा आम्ही नायनाट करू

Recent Posts

See All
स्वबळाचा नारा काँग्रेसचा ! फायदा मात्र भाजपाचा !!

मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार! असा नारा भाई जगताप यांनी दिला आणि मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. मतदार यादीत घोळ झाला असा आरोप करीत भाजपा विरोधकांनी एकजुटीने आक्रमक भूमिका

 
 
 

Comments


bottom of page