top of page

निकष बाजूला ठेवून शेतकर्‍यांना भरिव मदत द्या, अन्यथा राज्यात फिरू देणार नाही - जरांगे पाटील

धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाची पाहाणी, आपत्तीग्रस्त नागरिकांशी संवाद


ree

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान झालेल्या चिंचपुर ढगे व पिंपळगाव परिसराला भेट दिली. यावेळी जरांगे पाटील यांनी शेतकर्‍यांची व्यथा जाणून घेत त्यांना धीर दिला. सरकारने निकष न लावत जेवढे नुकसान झाले आहे. तेवढी मदत द्यावी, अन्यथा महाराष्ट्र बंद केल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.


मदतीसाठी जनावरांच मृतदेह लागतील अशा अव्यवहार्य अटी रद्द करून शेतकर्‍यांना तात्काळ 100 टक्के आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. पिंपळगाव येथील आत्माराम दातखिळे यांना धीर देताना जरांगे यांनी नुकसानीचे पंचनामे करताना 50 टक्के 60 टक्के असे करू नका, असे आवाहन सरकारी अधिकार्‍यांना केले. शेतमालाचे नुकसान, जनावरांचे मृत्यू, घरांचे झालेले नुकसान या सार्‍या गोष्टी गंभीर आहेत. सरकारने तत्काळ मदतकार्य सुरू करून शेतकर्‍यांना आधार देणे गरजेचे आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.


अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल आहेत. पिकांच्या नकसानीसोबतच जनावरांचे मृत्यू आणि घरांच्या पडझडीने अधिक वेदना झाल्याची व्यथा शेतकर्‍यांनी जरांगे पाटील यांच्याजवळ व्यक्त केल्या तसेच सरकारडून तातडीने मदत मिळावी, ही अपेक्षा शेतकर्‍यांनी टाहो फोडत व्यक्त केली.

Comments


bottom of page