निनावी पत्राने विकृत खरातचं बीड कनेक्शन उघड? गर्भलिंगनिदानाचे नाशिक व्हाया बीड,पत्रात चाकणकरचा उल्लेख
- Navnath Yewale
- 17 hours ago
- 1 min read

बीड: अशोक खरात प्रकरणी अद्यापही एसआयटीकडून आरोपीचा कसून तपास केला जात आहे. या तपासातून दररोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात गर्भलिंगनिदानाचे धक्कादायक बीड कनेक्शन समोर आले आहे. विशेष म्हणजे याही प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांचे नाव समोर आले आहे. यामुळे चाकणकरांच्या आडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना बीडमधून निनावी पत्र आले आहे. या पत्रातून बीड कनेक्शन समोर आलं आहे.
रुपाली चाकणकर यांच्या आशिर्वादाने बीडमधील महिला पदाधिकारी अशोक खरातकडे येथील महिला नेत होत्या, असा खळबळजनक दावाही या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे गर्भलिंग निदान याबाबत चाकणकरांकडून अशोक खरात पाठराखण केली जात असल्याचा अरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या हेमा पिंपळे यांनी केला आहे. पिंपळे यांनी संबंधित पत्राचा दाखलाही दिला आहे.
बीडमधील डॉक्टरांकडून लिंगनिदान केलं जात होतं, असा गंभीर आरेाप पत्रातून करण्यात आला आहे. या पत्रानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी पत्राची सत्यता तपासून पोलीस अधीक्षकांना सुमोटो दाखल करून हे पत्र एसआयटीकडे द्यावे, याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा लिंगनिदान होण्यासाठी पाठबळ देत होत्या, ही गंभीर बाब असल्याचा अरोप त्यांनी केला.
संबंधित पत्रावरील सहीची तपासणी केली तर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचता येईल, म्हणून त्याची सत्यता तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, अशोक खरातकडे बीडमधील महिला जात होत्या अशी चर्चा आतापर्यंत बीडमध्ये होती. परंतु या पत्रातून त्याला उजाळा मिळाला असल्याचं हेमा पिंपळे म्हणाल्या.



Comments