top of page

महाराष्ट्राच्या मंत्रालयाला खाबुगिरीची वाळवी? मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खात्याच्या कार्यालयातील लाचखोरीचा ‘लाड’ एसीबीच्या जाळ्यात

मुंबई: मंत्री नरहरी झीरवाळ यांच्या कार्यालयात काम करणार्‍या क्लार्कला काही दिवसांपूर्वी एसीबीकडून अटक झाली होती. राज्यभरात खळबळ उडवून देण्यार्‍या या घटनेनंतर विरोधकांकडून मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. मंत्रालयातील या प्रकरणाचा निखरा कायम असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार्‍या अर्थ आणि नियोजन खात्यातील बड्या अधिकार्‍याला आज अटक झाली आहे. निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल 6 लाख 37 हजर रुपायांची लाच धेताना रंगेहात सापडला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) खारघर परिसरात कारवाई करत त्याला अटक केली आहे. कक्षअधिकारी या पदावर असेल्या विलास लाड मोठ्या शिताफिने एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.


मंत्रालयात काही दिवसांपूर्वी मंत्री नरहरी झीरवाळ यांच्या कार्यालयात एसीबीने मोठी कारवाई करत 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना कार्यालयातील लिपिकाला अटक केली होती. या प्रकरणानंतरच मंत्रालयातील लाचखोरीचा मुद्दा राज्यभर चांगलाच गाजला होता, तर या मुद्यावर अधिवेशनात देखील जोरदार चर्चा झाली होती. तसेच मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी लावून धरली होती.


मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाच्या लाच प्रकरणाचा निखरा कायम असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील असलेल्या खात्याच्या कार्यालयातीलच एका अधिकार्‍याला लाचेचे ‘लाड’ करताना एसबीने रंगेहात पकडले आहे. मंत्रालयातील अर्थ आणि नियोजन खात्याच्या कार्यालयातील कक्षअधिकारी विलास लाड यास 6 लाख 37 हजार रुपये लाचेच्या मागणीनुसार खारघर परिसरात लाच स्वीकारताना एसबीने रंगेहात पकडल्याने मंत्रालयात खाबुगिरीचे ‘लाड’ समोर आले आहेत.

दरम्यान, लाड याने निधी मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. ज्याची तक्रार एसीबीकडे देण्यात आली होती. या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचून लाचखोर ‘लाड’ याला खरघर परिसरात लाच घेताना रंगेहाथ अटक केली. तर याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंत्रालयातून निधी मंजूर करून देण्यासाठी विलास लाड याने लाच मागितली होती.


या घटनेनंतर आता राज्यभरात खळबळ उडाली असून मंत्रालयातील कामासाठी लाच घेताना अशा पद्धतीने अधिाकर्‍याला अटक झाल्याची ही दुसरी घटना समोर आली आहे. तर अर्थ व नियोजन विभाग हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असलेल्या खात्या अंतर्गत येत असल्याने यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपल्याच खात्यावर वचक राहिला नाही का? असा सवाला दबक्या आवाजात उपस्थित होत आहे.

Comments


bottom of page