top of page

एटीएस, दिल्ली पोलिसांची मुंबईत मोठी कारवाई दोन संशयित दहशतवादी अटकेत; खेळण्यातील गाड्यांनी दिल्ली हादरवण्याचा ‘जैश’ कट उधळला

मुंबई : मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने संयुक्त कारवाई करत एक मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. या कारवाईत मोसाब अहमद उर्फ कलाम आणि मोहम्मद हमाद कलरा या दोन संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोघेही जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे दिल्लीमध्ये खेळण्याच्यसा काराचा वापर करून स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होते. या कटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने कुर्ला आणि खडवली परिसरात संयुक्त मोहिम राबवून दोघांना ताब्यात घेतले.


कलाम आणि कलरा हे दोघेही ऑनलाईन माध्यमातून कट्टरपंथी विचारांकडे वळले होते आणि त्यांचे ब्रेनवॉश करण्यात आले होते. असे तपास यंत्रणांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यांच्या ताब्यातून काही संवेदनशील साहित्यही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.


सध्या दोन्ही आरोपींना दिल्लीत नेण्यात आले आहे, तिथे त्यांना न्यायालयात हजर करून पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडी (रिमांड) मागितली जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमार्फत केला जाणार आहे. या कारवाईमुळे राजधानी दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला होण्यापासून टळल्याचे मानले जात आहे.

Comments


bottom of page