top of page

निमिषा प्रियाला फाशी; येमेनमध्ये शिक्षेची क्रुर पद्धत, थरकाप उडवणारा मृत्यूदंड

ree

भारताची नर्स निमिषा प्रिया हिला 16 जूूलै रोजी येमेनमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. येमेन नागरिक आणि व्यवसायिक भागीदाराच्या हत्येप्रकरणी निमिषाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निमिषा प्रियाच्या कुटुंबाने पीडित कुटुंबाला ब्लड मनी देऊन शिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला पीडित कुटुंबाने मान्यता दिली नाही.येमेनमध्ये फाशीची शिक्षा अत्यंत क्रुरपणे दिली जाते, ज्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका होते.


भारतीय नर्स निमिषा हिच्यावर 2017 साली येमेनी नागरिक तलाल अब्दो महदीची हत्या केल्याचा आरोप आहे. निमिषाने महदीची हत्या करून त्याच्या शरिराचे तुकडे केले आणि टाकीत फेकून दिले. यानंतर येमेनमधल्या कोर्टाने निमिषाला दोषी ठरवलं आणि फाशीची शिक्षा दिली. येमेनमधील मृत्यूदंडाची शिक्षा इस्लामिक शरिया कायद्यावर आधारित आहे. येमेनमधील फाशीची शिक्षस अत्यंत क्रुर आणि अमानवी मानली जाते.


येमेनमध्ये फायरिंग स्कॉडद्वारे फाशीची शिक्षा देण्यापूर्वी कैद्याला कोणतेही विशेष अन्न देण्याची किंवा त्याची कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करण्याची परंपरा सहसा नसते. येमेनमध्ये फाशीची शिक्षा देण्याची प्रक्रिया खूप कठोर आहे, ज्यामध्ये धार्मीक आणि कायदेशीर प्रक्रिया पाळल्या जातात. कैद्याला सहसा त्याच्या शिक्षेबद्दल आगाऊ माहिती दिली जाते. शेवटच्या क्षणी, त्याला धार्मिक विधी (जसे की नामज पठण किंवा कुराणातील आयती ऐकणे) करण्याची संधी दिली जाते जेणेकरून तो पश्चात्ताप करू शकेल आणि अल्लाहकडून क्षमा मागू शकेल.


यानंतर, फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधून उघड्यावर आणले जाते जिथे त्याला फाशीची शिक्षा द्यायची असते. पट्टी बांधण्याचा उद्देश कैद्याला गोळी झाल्याचे दृश्य दाखवू नये आणि मानसिक दबाव कमी करावा हा असतो. शिक्षेच्या वेळी, कैद्याला सहसा ब्लँकेट किंवा कापडात गुंडाळले जाते. यानंतर त्याला ब्लँकेट किंवा कार्पेटवर उलटे झोपवले जाते. नंतर 3 ते 5 जल्लाद त्याच्या पाठीवर, विशेषत: ह्रदयाच्या ठिकाणी, स्वयंचलित रायफलमधून अनेक गोळ्या झाडतात. जणेकरून तो ताबडतोब मरेल.


येमेनमध्ये कायद्यानुसार, गोळीबार, दगड मारणे किंवा शिरच्छेद करणे यासारखे मृत्यूदंड देण्याचे अनेक मार्ग आहेत. पण सर्वात सामान्य पद्धत म्हणजे गोळीबार. येमेनमध्ये राष्ट्रपतींना फाशीची शिक्षा माफ करण्याचा किंवा थांबवण्याचा अधिकार आहे. पण येमेनच्या हुथी प्रशासनाने निमिषाच्या फाशीला मान्यता दिली आहे. दरम्यान जर दोषी महिला गर्भवती असेल तर बाळाच्या जन्मानंतर दुसरी व्यक्ती बाळाची काळजी घेत असल्याचे आढळत नाही, तोपर्यंत शिक्षा दिली जात नाही. अशा पिरिस्थितीत, तिची शिक्षा एक ते दिड वर्षांनी वाढवली जाते.


येमेनेच्या कायद्यानुसार, अनेक गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा दिली जाते, ज्यामध्ये फक्त हत्या, बलात्कार किंवा दहशतवादच नाही तर व्यभिचार, समलैंगिता, धर्मांतर, अंमली पदार्थाची तस्करी, देशद्रोह, हेरगिरी आणि लष्करी गुन्हे देखील समाविष्ठ आहेत. सन 2014 पासून येमेनच्या उत्तरेकडील भागांवर हुथी बंडखोरांचे नियंत्रण आहे, ज्यांनी मृत्यूदंडाचा वापर वाढवला आहे, विशेषत: “ नैतिक गुन्हे ” आणि राजकीय विरोधकांविरुद्ध हुथी प्रशासनाने अलिकडच्या वर्षात सामुहिक मृत्युदंडाची शिक्षा दिली आहे, त्यापैकी अनेकांना खटल्यांशिवाय फाशी देण्यात आली. येमेनमधील न्यायालयीन प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षतेचा अभावी आहे. बर्‍याचदा आरोपींना योग्य कायदेशीर मदत किंवा निष्पक्ष खटलाही मिळत नाही. त्याचबरोबर येमेनमध्ये अल्पवयीन मुलांनाही मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, जे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. येमेनमध्ये हुथींनी केलेल्या फाशीची आंतरराष्ट्रीय स्तरावर टीकाही झाली आहे, परंतु त्याचा येमेनवार कोणताही परिणाम झालेला नाही.


Comments


bottom of page