निवडणुक आयोग भाजपसाठी काम करत आहे, ही शंका सर्व जनतेच्या मनात आहे- बाळासाहेब थोरात
- Navnath Yewale
- Aug 9, 2025
- 1 min read

लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून निवडणुक अयोगावर आरोप सुरूच आहेत. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. ‘ महाराष्ट्र विधानसीा निवडणूकीपूर्वी 2 माणसं मला भेटायला आली होती. ही दोन माणंस मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडुन आणण्याची गॅरंटी देत होते. 160 जागांवर ते मतांची फरफार करण्याबाबत मला सांगत होते, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.
अलीकडच्या काळातला निवडणुका खूप संशयास्पद होत आहेत, त्यामुळे हे नाकारता येणार नाही. अनेक शंका आजही निर्माण होत आहेत. राहुल गांधींनी जे मांडलं त्याचं उत्तर निवडणुक आयोग देऊ शकलं नाही. हरियाणा पुन्हा भाजपकडे जातं, हे कसं होऊ शकतं? शंका घेण्याचसाठी अनेक जागा आहेत, शंकांचं निरसन करणे ही निवडणुक आयोगाची जबाबदारी आहे, मात्र निवडणुक आयोग उत्तर देऊ शकत नाही, ही वस्तस्थिती आहे.
शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे असे काही एजंटच फिरत असतील, तर ईव्हिएम संदर्भातही प्रश्न निर्माण होतो. मतदानावर लोकशाही चालते, त्या मतदानावरच शंका निर्माण होत असेल तर ही निवडणुक आयोगाची जबाबदारी आहे. अत्यंत निरपेक्ष आणि पारदर्शक निवडणुका होणं, अत्यंत गरजेचं आहे. निवडणुक आयोग भाजपसाठी काम करत आहे, ही शंका सर्व जनतेच्या मनात आहे. अत्यंत निरपेक्ष आणि पारदर्शक निवडणुका होणं, अत्यंत गरजेचं आहे. निवडणुक आयोग भाजपसाठी काम करत आहे, ही शंका सर्व जनतेच्या मनात आहे, असं यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे शरद पवार यांच्या या वक्तव्याचा भाजपकडून देखील जोरदार समाचार घेण्यात आला आहे. शरद पवारांनी जो काही आरोप केला तो बिनबुडाचा आहे. तथ्यहीन आहे, या राज्यातील जनतेचा अपमान करणारे हे आरोप आहेत, त्यांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.



Comments