top of page

निवडणुकीपूर्वीच भाजपचा मोठा विजय!, 100 नगरसेवक, 3 नगराध्यक्ष जिंकले

ree

बीड: राज्यात कडाक्याच्या थंडीत नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांनी राजकीय वातावरण तापलं आहे. मुंबईत भाजपने 100 चे टार्गेट ठेवले आहे. अशातच निवडणुकी आधीच महाराष्ट्रात भाजपने सर्वात मोठा विजय मिळवला आहे. महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वीच 100 नगरसेवक, 3 नगराध्यक्ष जिंकले आहेत.


नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत भाजपने शतक ठाकेले आहे. निकालापूर्वी शंभर जागांवर भाजपच्या उमेदवारांची बिनविरोधत निवड झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामुळे बिनविरोध निवडीचा चमत्कार झाल्याची प्रतिक्रिया रविंद्र चव्हाण यांनी दिली. नगरपालिका आणि नगरपंचायतसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आजच्या दिवशी बिनविरोध निवड झाली. बिनविरोध नगरसेवक-100, बिनविरोध नगराध्यक्ष-3 यामध्ये उत्तर महाराष्ट्रात 49 नगरसेवक, पश्चिम महाराष्ट्र 41 नगरसेवक, मराठवाडा 3 नगरसेवक, विदर्भ 3 नगरसेवकांचा समावेश आहे.


दरम्यान, निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान घेतलं जाणार आहे. तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीसाठी निवडणुक घेतली जाईल. कोकण विभागात 27, नाशिक विभागात 49, पुण्यामध्ये 60, छत्रपती संभाजीनगरमध्ये 52 आणि अमरावती विभागात 45 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. 10 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर असून, उमेदवारांच्या आर्जाची छाननी 18 नोव्हेबरपासून होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर आहे. 13 हजार 355 केंद्रावर निवडणुक पार पडणार आहे. दुबार मतदारांबाबत निवडणूक आयोगाकडून दक्षात घेण्यात आली आहे.

Comments


bottom of page