top of page

निवडणूक अयोगाच्या काराभारा विरोधात विराट मोर्चाचे अयोजन

मुंबईत 1 नोव्हेबरला विरोधी सर्वपक्षीय मोर्चा; महाविकास आघाडीचा पत्रकार परिषदेत इशारा

ree

मुंबई : राज्याच्या मतदार याद्यांमध्ये एक कोटीहून अधिक मतदार घूसविण्यात आले आहेत. ठिकठिकाणच्या मतदार याद्यातून कित्तेकांना वगळण्यात आल्याचा आरोप करत आज निवडणूक आयोगाच्या काराभारा विरोधात महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद संपन्न झाली. याशिवाय मनसेचा मेळावाही संपन्न झाला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर तोफ डागली तर महाविकास आघाडीनेही येत्या 1 नोव्हेबरला मुंबईत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात विराट मोर्चाची घोषणा केली.


निवडणुकीचे मॅच फिक्सिंग झाले आहे. सुमारे एक कोटी बोगस मतदार आहे. हे घुसखोर आहेत. यांना बाहेर काढणे गरजेचे आहे. 1 नोव्हेंबरला मुंबईत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येईल. मतदारांची ताकद आम्ही पंतप्रधान यांना दाखवली जाईल. या मोर्चाचे नेतृत्व शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे करतील. अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सर्वपक्षीय विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. या वेळी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, माकपचे प्रकाश रेड्डी, काँग्रेसचे सचिन सावंत उपस्थित होते.


खासदार राऊत म्हणाले की, आज उद्धव ठाकरे यांच्यावतीने आम्ही आज पत्रकार परिषद घेत आहोत. मनसेचे पदाधिकारीही येथे आले आहेत हे आनंदाची गोष्ट आहे. मतदार यादी घोटाळ्या बाबत निवडणूक आयोगा विरोधात आम्ही लढाई लढत आहोत. निवडणुकीचे मॅच फिक्सिंग झाले आहे. आमदार विलास भुमरे असे म्हणाले मी 20 हजार मतदार बाहेरुन आणले. मी दुबार लोकांचे नाव दिली पण काढले नाही, हे मंदा म्हात्रे यांचे महत्वाचे वाक्य आहे. संजय गायकवाड यांनी सांगितले आहे बुलढाण्यात 1 लाख पेक्षा जास्त बोगस मतदार आहेत. आता यांना दणका द्यावा लागेल. रस्त्यावर उतरावे लागेल. यासाठी आता 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या कारभारावर मुंबईत एक विराट मोर्चा काढण्यात येईल. मतदारांची ताकद पंतप्रधान यांना दाखवली जाईल. या मोर्चाचे नेतृत्व शरद पवार, उद्धव ठाकरे, आणि राज ठाकरे करतील.


निवडणूक आयोग अनेक गोष्टी लपवत आहे:

मतदार यादी घोळाबाबत आमची निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांबरोबर चर्चा झाल्या. अनेक उदाहरण आहे आम्ही समोर दिली नाही. निवडणूक अयोगाने उत्तर देणे अपेक्षा होती. मात्र त्यांचे उत्तर समाधान कारक नाही आहे. त्यामुळेच आता सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात निर्णय झाला आहे. मतदार यादीत चुकीच्या वाटेने लोक घुसवले आहेत. लोकशाहीला धक्का पोहोचवण्याचे काम ज्यांच्याकडून होत असून त्यांच्या विरोधात हा मोर्चा आहे. पारदर्शकता हेच लोकशाहीचे मर्म आहे. बर्‍याच गोष्टी निवडणूक आयोग लपवत आहे. आता 1 नोव्हेंबर रोजी आयोजीत मोर्चात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.


मतदान चोरीबाबत राहुल गांधी यांनी यापूर्वीही सांगितलेले आहे. आता महारष्ट्रात निवडणूक अयोगाने विरोधी पक्षांच्या नेत्यांची मागणी मान्य केलेली नाही. निवडणूक अयोगाने हात झटकले आहेत. जी यादी केली आहे त्यात घोळ आहे. आम्हाला ती यादी प्राप्त झाली नाही. आदर्श प्रक्रिया राबवली जात नसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

मदार यादीतील घोटाळा मोठा आहे. सामान्य लोकांना विश्वास निर्माण होण्यासाठी निवडणूक अयोगाची विश्वासार्त राहिली पाहिजे. आता आम्ही 1 नोव्हेंबरला मोर्चा काढून पुन्हा एकदा आमच्या मागण्या मांडणार असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.


मतदार यादी पारदर्शक असणे अपेक्षित आहे. यामध्ये सुधारणा केली पाहिजे. याबाबत आम्ही दोनवेळा निवडणूक अयोगाच्या अधिकार्‍यांची भेटही घेतली. जो खुलासा करण्यात आला तो खोटा आहे. आम्ही सांगितले त्यात सुधारणा झाली पाहिजे. मतदार यादीचा मुद्दा प्राथमिक आहे. आम्ही आमची तीव्र भावना दाखवण्यासाठी हा मोर्चा काढणार असल्याचे माकपचे प्रकाश रेड्डी म्हणाले

Comments


bottom of page