निवडणूक आयोगाच्या ‘टाइम बॉम्ब’ उत्तराने वाद चिघळला!
- Navnath Yewale
- Aug 8
- 2 min read
एक लाख मतदानकेंद्रांचे फुटेज तपासण्यासाठी, राहुल गांधी तुम्हाला 273 वर्षे लागतील - निवडणूक आयोग

निवडणूक आयोगाने लोसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मागणीवर एक मोठे आणि मनोजरंक उत्तर दिले आहे. ज्यात त्यांनी संपूर्ण देशाची मतदार यादी डिजिटल स्वरूपात देण्याची आणि सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केले होती. आयोगाने शुक्रवारी म्हटले की, एक लाख मतदान केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी एक लाख दिवस म्हणजेच 173 वर्षे लागतील. ज्याचे कोणतेही कायदेशीर परिणाम संभव नाहीत. कोणताही उमेदवार जर निवडणूकीच्या विरोधात याचिका दाखल करत असेल,तर सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवले जाते, अन्यथा ते ठेवण्यात काही अर्थ नाही.
राहुल गांधी यांनी आरेाप आणि प्रश्न विचारले होते की, मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही आणि व्हिडिओ पुरावे का आणि कोणाच्या सांगण्यावरून नष्ट केले जात आहेत? बनावट मतदान आणि मतदार यादीत गडबड का केली गेली? विरोधी नेत्यांना का धमकावले जात आहे? स्पष्टपणे सांगा की निवडणूक आयोग आता भाजपचा एजंट बनला आहे का?
जर इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला तर ते हे सिद्ध करून दाखवतील की पंतप्रधान मत चोरी करून या पदावर आले आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. त्यांनी पुन्हा म्हटले की, केवळ 25 जागांमुळे आज नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर आहेत. काँग्रेस नेत्याने सांगितले की, लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक झाली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आमची युती जिंकली. पण सहा महिन्यानंतर आश्चर्यकारक निकाल आले. महाराष्ट्रात केवळ पाच महिन्यांच्या आत एक कोटी नवीन मतदारांनी मतदान केले आणि या सर्वांना भाजपला मतदान केले.
निवडणूक आयोगाकडे डिजिटल मतदार यादी आणि मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही फुटेज मागितले अतसा, त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की, त्यानंतर बेंगळुरु मध्य लोकसभा मतदारसंघातील महादेवपूरा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीचा अभ्यास करण्यात आला. तेव्हा हे सिद्ध झाले की लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपने मतांची चोरी केली आहे. त्यांनी दावा केला की, महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाच्या विश्लेषणातून हे स्पष्ट झाले आहे की, प्रत्येक सहा मतापैकी एका मताची चोरी झाली आहे.


Comments