top of page

नुकसानीला मराठवाड्यात उरलंय काय?

जमिनीच्या सुपीकतेसाठी शेतकर्‍यांनी माती आणावी कुठून, पोत पूर्वस्तरावर यायला किती तप लागणार ?

ree

बीड: मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागच्या काही दिवसांपासून पासानं अक्षरश: कहर केला आहे. या अतिवृष्टीमुळे हाताशी आलेला खरिप पिकांचा चिखल झाला. कित्तेक जनावरांना आणि माणसांना जीव गमवावा लागला.

नदी-नाल्यांच्या महापूराचे पाणी शिरल्याने घरात जे जे होतं, ते सगळं या पुरात वाहून गेलं. शाळकरी मुलांच्या वह्या-पुस्तकांपासून ज्येष्ठांच्या उतारवायात आधार ठरणारी काठी देखील वाहून गेली. अन्नधान्य, संसारपयोगी साहित्यही पुरात वाहून गेल्याने अंगच्या कपड्यावर नागरिकांना भरलं घर सोडण्याचा बाका प्रसंग ओढावला.


या पावसामुळं झालेलं आर्थीक नुकसान भरून काढायला, संसार कोलमलडून पडल्यामुळे खचलेल्या लोकांना पुन्हा उभं रहायला किती काळ लागेल याचा विचार करणंही कठीण आहे. शेती महाराष्ट्राचा कणा आहे.आता पिकांच्या झालेल्या नुकसानमुळे शेतकरी कर्जाच्या चक्रात अडकून शकतात आणि स्थानिक अर्थव्यवस्था मंदीचा समाना करावा लागू शकतो.

मात्र, पिढ्यानपिढ्या मराठवाड्यातू न हटणार्‍या दुष्काळाचं रुपांतर यंदा अतिवृष्टीत झालं आणि होत्याच नव्हतं झालं. अतिवृष्टीमुळे गोठ्यात दावनीलाच अनेक जनावरांनी जीव सोडला.


कित्तेक नागरिक पुराच्या पाण्यात वाहून गेले पैकी काही आणखीही बेपत्ता आहेत. घरात पाणी शिरल्याने कित्तेक नागरिकांना रेस्क्यू करण्यात यश आले. काहींना तर हेलिकॉप्टरच्या साह्याने रेस्क्यू करावे लागले. कसदार जमीन पिकांसह खरडून गेली. नदीकाठच्या जमिनी दहा ते पंधरा फूट खोल वाहून गेल्याने बहुतांश शेतकरी सातबारा असताना भूमिहीन झाले आहेत. कापुस, सोयाबीन, तुर, उडीद, मका, बाजरी, उस यासह फळबागांही भूईसपाटतर झाल्याच पण काढणीला आलेले उत्पादन पाण्यात सडल्यामुळे हातचे गेले. प्रशासनाकडून सरकट मदतीची घोषणा करण्यात आली असली तरी खरडून गेलेली जमीन, घर, व्यवसायीकांचे पंचनामे सुरू आहेत.

ree

प्रत्यक्ष घरातलं सगळच वाहून गेलं, जमिनीतील पीके नाहीशी झाली, व्यवसायिकांच्या दुकानातील साहित्य वाहून गेलंय मग पंचनाम्यामध्ये नुकसान नमुद करण्यासाठी उरलं तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे. अतिवृष्टीमुळे जमिनीचा कस वाहून गेल्याने सुपीक जमिन नापिक झाली आहे. शेतकर्‍यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी माती टाकावी तर ती कुठली? असाही यक्ष प्रश्न आहे. आहे ती जमिन सुपीकतेच्या पूर्व स्तरावर येण्यास किती वर्ष, तप नव्हे पिढ्या लागतील याचा तर्क न लावला बरा.

Comments


bottom of page