पंढरपुरात मराठा समन्वयक हाके समर्थकात शाब्दीक चकमक
- Navnath Yewale
- Nov 8, 2025
- 1 min read

पंढरपुर: पंढरपुरातील शासकिय विश्रामगृहावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा समन्वयकामध्ये शाब्दीक चकमक समोर आली आहे. दोन्ही गटाच्या पत्रकार परिषदेनंतर हा राडा झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण निवाळले.
पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमिन गैरव्यवहार प्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी पंढरपुरात पत्रकार परिषद आयोजीत केली होती. शासकिय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत हाके यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल पत्रकारांना माहिती दिली. याचवेळी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आंतरवालीमध्ये पत्रकार परिषदेद्वारे घातपाताच्या कटाचे खुलासे करणार होते.
जरांगे पाटील यांच्या घातापाताच्या कटाच्या संदर्भात मराठा समन्वयक धनाजी साकळकर यांनी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. दोन्ही गटांच्या पत्रकार परिषदेनंतर मराठा ओबीसी कार्यकर्त्यांनी विश्रामगृहाच्या प्रांगणात घोषणाबाजी केली. घोषणाबाजीचे पर्यावसान शाब्दीक बाचाबाचीमध्ये लक्ष्मण हाके यांनी धनाजी साकळकर यांना एकेरी भाषेत तर धनाजी साकळकर यांनी हाके यांना एकेरी भाषेत प्रत्यूत्तर देत एकमेकांवर चालून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी मध्यस्थि करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवल्याने प्रकरण निवाळले.



Comments