पाकिस्तान खूप मोठ्या हल्ल्याच्या प्रयत्नात होता, पंतप्रधान मोदींनी लोकसभेत दिली ऑपरेशन सिंदूरची महत्वाची माहिती
- Navnath Yewale
- Jul 29
- 2 min read
Updated: Jul 31

लोकसभेत ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्यालवरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारची भूमिका मांडली. ऑपरेशन सिंदूरचा उद्देश दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करणे हा त्यामुळे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर आम्ही आमच्या स्वत:च्या अटींवर युद्धबंदी केली, असं पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सांगितलं. यावेळी मोदींनी 9 मे च्या रात्री काय घडलं याची माहिती दिली.
अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी फोन करून पाकिस्तान एक मोठा हल्ला करणार असल्याची माहिती दिली होती, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. दरम्यान, जगातील कोणत्याही नेत्याला भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितले नाही. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी 9 मे च्या रात्री मला नक्कीच फोन केला होता. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीं मला फोन करत होते त्यावेळी मी सैनिकांसोबत मिटींगमध्ये होतो.
त्यावेळी त्यांनी परत एकदा फोन केला. तेव्हा उपराष्ट्रपतींनी सांगितलं की, पाकिस्तान मोठा हल्ला करणार आहे. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, पाकिस्तान मोठा हल्ला करेल तर आम्ही त्यापेक्षा मोठा हल्ला करू. गोळीला गोळीने उत्तर देऊ. या 9 आणि 10 मे ला पाकिस्तानाच्या सैन्याची ताकद कमी केली. पाकिस्तान जवळजवळ 1000 मिसाईल आणि ड्रोन्सच्या मदतीने भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्नात होता.
या मिसाईल भारताच्या कोणत्याही भागावर पडल्या असत्या तर तिथे विध्वंस झाला असता. पण या 1000 मिसाईल्स आणि ड्रोन्सला भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने आकाशात हाणून पाडले, असंही मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. पाकिस्तानने आदमपूर एअरबेसवर हल्ला झाल्याची खोटी माहिती पसरवली. पण मी दुसर्या दिवशीच आदमपूरला गेलो आणि पाकिस्तानचं खोटं उघडं पाडलं, असेही मोदी म्हणाले.
आमच्यावर एवढा मोठा हल्ला होईल, असा पाकिस्तानने कधीच विचार केला नव्हाता. तेव्हा पाकिस्तानने भारताच्या डीजीएमओला फोन करून विनंती केली होती. हे बंद करा. बरंच मारलं. आता अधिक मार खाण्याची आमच्यात ताकद नाही. प्लीज हल्ला रोखा, असं पाकिस्तानचा डीजीएमएकडून आम्हाला विनंती करण्यात आली, असे मोदींनी संसदेत सांगितले. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं तेव्हाच सांगितलं होतं की, आम्ही आमचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. परत असं कराल तर महागात पडेल. आमची अॅक्शन नॉन एक्सेलेटरी आहे, हे आम्ही आधीच सांगितलं होतं. त्यामुळेच आम्ही हा हल्ला रोखला असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.



Comments