top of page

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौरपदाच्या निवडीत गोंधळ!

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी राखीव सुटल्याने महापौरपदासाठी मोठी रस्सीखेच पहायला मिळाली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. महापौर आणि उपमहापौर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नावांची घोशणा झाल्यावर उपमहापौरपदाच्या उमेदवाराने महापालिका भवन सोडले. यामुळे एकच गोंधळ उडाला.


पिंपरी चिंचवडमध्ये सलग दुसर्‍यांदा भाजपची सत्ता आली आहे. भाजपचा दुसर्‍या टर्म मधील पहिला महापौर होण्याचा मान रवी लांडगे यांना देण्यात आला आहे. सलग दोन वेळा ते बिनविरोध नगरसेवक झाले आहेत. उपमहापौर पदी भाजपच्या निष्ठावान शीतल शिंदे यांखी निवड झाली आहे. पिंपरी चिंचवड - भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि रवी लांडगे यांच्यात संघर्ष होता. मात्र निवडणुकीत गाव एकत्र करण्याच्या दृष्टीने महेश लांडगे यांनी पुढाकार घेत वाद मिटविला. आता महापौर पद देत गावकी मधील एकी अभेद्य करण्याचा लांडगे यांनी प्रयत्न केला आहे.


महापौर आणि उपमहापौर यांच्या नावांची घोषणा झाली. महापौरपदी निवड झालेल्या विजय उर्फ शीतल शिंदे यांनी पद स्वीकारण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. शीतल शिंदे हे महापौर पदासाठी इच्छुक होते. भाजप उपमहापौर निवडीमध्ये ट्विस्ट आला आहे. उपमहापौरपदी नावाची घोषणा झाल्यावर विजय उर्फ शीतल शिंदेंनी महापालिका भवन सोडले. आता भाजप कसा मार्ग काढणार यांची उत्सुकता लागली आहे.


दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर पिंपरी चिंचवड महापौरपदाच्या निवडणुकीत, राष्ट्रवादी पक्ष उमेदवार देणार नाही. दिवंगत अजित पवारांनी इथं भाजपला आव्हान दिलं होतं. मात्र ही निवडणुक पार पडली आणि त्यानंतर अजित पवारांचं अपघाती निधन झालं. हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदाची निवडणुक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. भाजपकडून उमेदवरी अर्ज दाखल झाला नाही तर विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचा उपमहापौर होण्याची शक्यता आहे.

Comments


bottom of page