top of page

पुण्यात दहशतवादी घुसले? कोंढव्यात एटीएसचा सर्च ऑपरेशन एटीएससह पोलिस यंत्रणा सतर्क

ree

पुणे: रात्रीच्यावेळी जेव्हा संगळं पुणे शहर झोपेच्या आधीन झालं होतं... तेव्हाचं कोंढवा परिसराला छावणीचं स्वरुप आलं.. देशविरोधी कारवाई होण्याची शक्यता असल्यानं पुणे पोलिस आणि एटीएस च्या पथकानं 25 ठिकाणी छापेमारी केली..2023 मध्ये याचं कोंढवामध्ये बंदी असलेल्या दहशवादी संघटनेच्या 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ज्यामुळे एटीएस ला पुन्हा त्याच भागात संशयितांचे जाळे सक्रिय असल्याचा संशय व्यक्त आला आणि त्यांनी दहशतवादी नेटवर्कचा शोध सुरू केला..


एसटी पुणे पोलिस, केंद्रातील सुरक्षा यंत्रणांचं सुयक्त ऑपरेशन मध्यरात्री सुरु झालं..आय लव मोहम्मद चळवळीतून पुण्याचं वातावरण दूषीत करण्याचा प्रयत्न असल्याचा एटीएसला संशय होता. काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. संशयिताकडून मोबाईल सीम कार्ड, लॅपटॉप, महत्वाची कागदपत्रंही जप्त करण्यात आले आहेत. तसचं संपलेल्या परदेशी लोकांनाही एटीएसनं ताब्यात घेतलं आहे.


मुळात कोंढवा परिसरात ठिकठिकाणी आय लव्ह मोहम्मद आणि “ इस्लाममध्ये संगीत हराम आहे ” अशा आशयाचे पोस्टर्स लागल्यानं समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशयही एटीएस ला होता. त्यामुळे सर्च ऑपरेशन केलं. याआधीही एटीएस नं कोंढवा परिसरातील आयएसआयएय शी संबधित 3 दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणार्‍या पुण्याला अशांत करण्याचा प्रयत्न नेमकं कोण करतयं? एटीएस आणि पोलिसांच्या चौकशीनंतर काय समोर येतं? याकडे अनेकाचं लक्ष लागला आहे.

Comments


bottom of page