top of page

पुण्यात मोशीमध्ये इमरात कोसळली, बचावकार्यासाठी थेट आर्मी पोहोचली; ढिगार्‍याखाली आडकलेल्या 20 पैकी 5 जण सुखरुप बाहेर काढले

पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवडच्या मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली आहे. या उमारतीच्या ढिगार्‍याखाली 20 जण अडकले होते, यातील 5 लोकांना बाहेर काढण्यात आल्याचे समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. ढिगार्‍याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य वेगाने सुरू असून, परिसरात मोठ्या प्रमाणात यंत्रणा तैनात करण्यात आली.


मिळालेल्या माहितीनुसार, या घाटनेतील लोकांच्या बचावासाठी आता आर्मीला पाचारण करण्यात आले आहे. आर्मीचे पथक आता कोसळलेल्या इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन राबवत आहे. इमारतीच्या मागील बाजूस कचरा डेपो असल्याने मोठ्याव प्रमाणात कचरा इमारतीच्या ढिगार्‍यावर पसरला असून, जेसीबीच्या साह्याने कचरा हटवण्याचे काम सुरू आहे. अद्याप यास घटनेत कोणतीही जीवीतहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.


या घटनेबाबत बोलताना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी म्हटले की, मोशी या ठिकाणी कचरा डेपो भागात इमारत कोसळली आहे. यामध्ये जवळपास वीस लोक होते त्यामधील पाच लोक वाचवले आहेत आणखी 15 लोक अडकलेले आहेत. अडकलेल्याव लोकांसोबत एनडीआरएफ जवनांचा संपर्क होत आहे. त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे आमचे प्रयत्न आहे.


पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय चौबे यांनी सांगितले की, मोशीमध्ये कचरा डेपोची इमारत कोसळली आहे. यामध्ये जवळपास वीस लोक अडकले होते, त्यापैकी पाच जण सुरक्षित बाहेर आले आहेत मात्र अद्यापही 15 लोक आतमध्ये आहेत अडकलेल्या लोकांसोबत आमचा संपर्क होत आहे. लवकरात लवकर त्यांना बाहेर काढणे आमचे प्रयत्न आहेत. दरम्यान या घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी केली आहे, त्यामुळे पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसराला वेढा घातला आहे. सध्या बचावकार्य वेगाने सुरू असून बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण समोर येणार आहे.

Comments


bottom of page