top of page

राज्यातील शेतकर्‍यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमफी; जाचक अटी रद्द, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरप विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना माहिती दिली आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्यवा शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांपर्यतचा लाभ मिळणार होता तो आता 2 लाख रुपयांपर्यंत मिळेल आणि प्रोत्साहनपर अनुदानासाठी 2026-27 चं पीक कर्ज भरण्याची अट रद्द करतो, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केेली. कर्जमाफीच्या निर्णयासाठी 2029 पर्यंत थांबू शकलो असतो मात्र आम्ही तसं केलं नाही, असंही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कर्जमाफी संदर्भात इथे बरीच चर्चा झाली. कर्जमाफी ही परिस्थितीची आवश्यकता म्हणून करत आहोत. कुठल्याही कर्जमाफीनं शेतकरी श्रीमंत झाला नाही तो होऊ शकत नाही. शेतकर्‍यांकडे सावकाराकडे जावं लागू नये हा एक उद्देश कर्जमाफीचा असतो. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्जमाफी करण्याचा शब्द दिला होता, आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो, आम्ही सर्व निवडणुका जिंकलो आहोत, मात्र आम्ही तसं केले नाही. शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी दिली पाहिजे हे ठरवलं आणि आपल्या सरकानं कर्जमाफीचा निर्णय केला. कर्जमाफी एकवेळ समझोता आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय घेतला महायुती सरकार दरवर्षी 25 हजा कोटी रुपयांची वीज माफी सरकार करतंय, दरवर्षी हे पैसे दिले जातात, असंही मुख्यमंत्री फडणवीय म्हणाले.


पुढे बोलताना फडणवीस म्हणाले. 2008 मध्येद देशात कर्जमाफी झाली, त्यानंतर 2009 मध्ये कर्जमाफी करण्यात आली. त्यावेळी 2008 मध्ये ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्यांना 2009 मध्ये वगळलं गेलं होतं. 2026-27 च्या कर्जाची परफेड केली पाहिजे, अशी अट टाकली होती, ज्यांना प्रोत्साहनपर लाभ देतोय, त्यांनी कर्ज वेळेत भरलं पाहिजे अशी भूमिका त्यामागील होती. सातत्यानं या संदर्भात अटी शर्थी आहेत, अशी मागणी होत होती. रणधीर सावकरांच्या नेतृत्वात महायुतीचे आमदार भेटले आणि 50 हजारांची अट काढून टाका अशी मागणी केली. मी त्यांना अट काढून टाकल्यानं4-5 हजार कोटींचा बोजा होईल. पण शिस्तीचा भाग म्हणून ही अट आणली आहे. समजा एक लाखांपर्यंत नेली तर 2 लाख शेतकरी फायदा न मिळणारे राहतात सगळ्याचं मत होतं, 2 लाख शेतकरी का सोडता. मी आर्थिक शिस्त सांगत होतो, लोक मला व्यापक विचार केला पाहिजे होता, असं सांगत होते.

महात्मा फुले कर्जमाफीमधील यासेजनेतील जे लोक होते ज्यांना 50 हजारांपर्यंत कर्जमाफी म्हटलं होतं. त्यांन देखील 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल. 2026-27 चा कर्ज भरण्यासंदर्भातील नियम वगळण्यात येईल. 2026 ला किती लोकांनी भरले याची माहिती आहे. 95 टक्के लोकांनी पैसे भरले. त्या आगोदरच्या तीन पैकी देान वर्षात ज्यांनी पैसे भरले ते आता पात्र होतील. पहिल्यांदा असा निर्णय झाला आहे, यूपर्वी असा निर्णय झालेला नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Comments


bottom of page