महाराष्ट्रातील भेसळखोरांचे कंबर्डे मोडणारा ‘ मुंढे पॅटर्न’ आता देशभरात!
- Navnath Yewale
- 1 day ago
- 1 min read

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी हॉटेल्समधील पदार्थ, दुध, पनीरपासून ते सौंदर्य प्रसाधानापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीतील भेसळखोरीचा पर्दाफाश करण्याचा धडका लावला आहे . त्यांच्या या धाड सत्रांची आणि कारवायांची महाराष्ट्रासह देशभरात जोरदार चर्चा आहे.
धडक कारवायांचा हाच ‘ मुंढे पॅटर्न’ देशभरातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरत आहे. आता तेलंगणा, कर्नाटकसारख्या राज्यांत ‘ मुंढे पॅटर्न’ राबवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या शेजारतील काही एफडीए अधिकार्यांनी तुकाराम मुंढेंशी संपर्क साधल्याची माहिती आहे.
दरम्यान बदली कुठल्याही विभागात झाली तरी सामान्य माणसांच्या प्रगतीसाइी काम करण्याचा तुकाराम मुुंढे यांचा प्रयत्न असतो. दोन महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे आयुक्त म्हणून बदली झाली. तेव्हापासून राज्यभरात अन्न व औषध प्रशसनाकडून मोठ्या प्रमाणात धाड सत्र सुरू झाले आहे. भेसळखोर, गुटखा वाहतूक यांच्यावर थेट मकोका लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे भेसळ करणारे आणि नियमबाह्य व्यवसाय करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. यामागे आयुक्त तुकाराम मुंढे यांचेच कडक आदेश असल्याचे बोलले जाते. तुकाराम मुंढे यांचा पॅटर्न आता देशभरात राबवला जाऊ शकतो. अशी खात्रीलायक माहिती आहे. मुढे पॅटर्न ची माहीती घेण्यासाठी इतर राज्यांच्या एफडीए आयुक्तांनी आणि बड्या आयएएस अधिकार्यांनी थेट मुंढे यांच्याशीच संपर्क साधल्याची माहिती आहे.
आपल्या राज्यातही अन्न आणि औषध विभागाचा कारभार पारदर्शक आणि कडक करण्यासाठी काय करता येऊ शकते? त्याची आंमलबजावणी कशी करायची, हे समजून घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करण्याचाही विचार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर राज्यांमध्येही पुढील काळात असे धाड सत्र पाहायला मिळू शकतात.



Comments