पुण्यातील एमपीएससीच्या 15 विद्यार्थी आंदोलकांवर गुन्हे, रोहित पवार संतप्त

पुणे: गेल्या दहा दिवसांपासून पणुयतील एस. एम. जोशी पूल येथे एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. काल विश्रामबाग पोलिस ठाण्यात आंदोलन करणार्या 15 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह प्रमोद पाटील, दिगंबर खाडे, ऋषिकेश गांगुर्डे आणि अक्षय कांबळे यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यातच दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे आक्रमक झालेल्या रोहित पवार यांनी थेट विश्रामबाग पोलिस ठाणे गाठलं आणि पोलिसांशी चर्चा केली. दाखल करण्यात आलेले गुन्हे पूर्णपणे चुकीचे असून, ज्या तीन ते चार व्यक्ती तिथे उपस्थित नव्हत्या, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असा आरोप त्यांनी केला. “ मी स्वत: तिथे भाषण केलं असूनही माझ्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही?” असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.
पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात एमपीएससी आंदोलनाचं आयोजक तसंच विद्यार्थ्यांवर आज दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी विश्रमाबाग पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस अधिकार्यांशी यासंदर्भात चर्चा केली आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपलं मत व्यक्त केलं.
यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, “ काल सकाळी आमच्या 14 विद्यार्थी आणि आयोजन समिती सदस्यांवर एफआयआर दाखल करण्यात आली. दि. 1 रोजी जेव्हा विद्यार्थ्यांशी चर्चा झाली, तेव्हा एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांचा जोपर्यंत राजीनामा येत नाही, तो पर्यंत राजीनामा येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला. त्यानुसार आम्ही एस.एम. जोशी पूल येथे आंदेालन सुरू केलं. मी पोलिसांना वारंवार सांगत होतो की विद्यार्थ्यांवर कारवाईक करू नका. तरीही विद्यार्थ्यांवर ही कारवाई का करण्यात आली? पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर पूर्णपणे चुकीची आहे. जे तीन ते चार जण तिथे उपस्थितही नव्हते, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मी स्वत: तिथे उपस्थित राहून भाषण केलं असताना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेली नाही.
अजितदादांच्या संदर्भात पोलीस एफआयआर दाखल करत नाहीत, मात्र गरीब मुलांच्या बाबतीत तातडीनं एफआयआर केली जाते. आज सकाळी देखील काही मुलांवर ड्रोन उडवले म्हणून गुन्हा दाखल केला, तर काहींना नोटीस बजावली आहे. या नोटिसीच्या माध्यमातून मुलांना धमकावलं जात असून त्यांना चक्क नक्षलवादी म्हटलं गेलं आहे. हे जे काही चाललं आहे. ते अत्यंत चुकीचं आहे. मी या आंदोलनात सर्वात जास्त बोललो असताना माझ्यावर का गुन्हा दाखल करण्यात आला नाही? काहीही करून हे आंदोलन मोडीत काढा, अशा सूचना वरून देण्यात आल्या असतील, तर आम्ही शांत बसणार नाही.
ते पुढे म्हणाले “ विद्यार्थी आता चांगलेच आक्रमक झाले असून उद्या जर त्यांनी एखादा मोठा निर्णय घेण्याचे ठरवलं, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. या आंदोलनात अनेक लोकांनी येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे. विद्यार्थी जी मागणी करत आहेत, त्यातील आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार हे मुख्यमंत्र्यांचे मित्र असून मुख्यमंत्री केवळ भीमनवार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री आपल्या मित्राला वाचवण्यासाठी निष्पाप विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहेत. सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बाजूनं घेतले जात असून ते आपल्या मित्राला पाठिंबा देत आहेत. मात्र सर्वसामान्य विद्यार्थ्यांकडे आणि नागरिकांकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही. दिल्लीतील आंदोलन ज्या पद्धतीनं मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला, त्याचाच परिणाम आता या आंदोलनातही पाहायला मिळणार असल्याचं रोहित पवार म्हणाले.



Comments