सीजेपीच्या आंदोनला परवानगी नाकारली: राजधानी दिल्लीत कडक नाकाबंदी, 250 रेल्वेगाड्या रद्द, 25 हजार पोलिसांची कुमक; मेट्रो स्थाके बंद , 120 सीआरपीच्या तुकड्या तैनात, 24 तास इंटरनेट सेवा स्थगित

रस्तोरस्ती उभे असलेले पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवन, मेट्रे स्थानके बंद, महत्वाच्या मार्गांवर उभारण्यात आलेले रस्तारोधक (बॅरिकेड्स), रेल्वेगाड्यांचे मार्ग बदललेले, रेल्वे स्थानके, बस थांबे, हॉटेल आणि अन्य संवेदनशील ठिकाणांवर सुरू असलेली कसून तपासणी.. हे चित्र आहे देशाची राजधाणी दिल्लीतले.
मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘ सीजेपी’ ने आज, शनिवारी राजधानीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी निदर्शनापूर्वी दिलेली अल्पमुदतीची पूर्वसूचना आणि यापूर्वीच्या निदर्शनांदरम्यान झालेले नियमांचे उल्लंघन या पार्श्वभूमिवर आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.
गेल्या जुलै महिन्यात सीजेपी आंदोलनाचा अनुभव लक्षात घेता निदर्शकांनी जंतर-मंतर येथे ठिय्या आंदोलन करू नये आणि मोठ्या प्रमाणावर लोकांची जमवाजमव होऊ नये म्हणून संपूर्ण शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
राजीव गांधी चौक, नवी दिल्ली, सेंट्रल सचिवालय, पटेल चौक आणि काश्मिर गेटसह 45 दिल्ली मेट्रो स्थानकांचे प्रवेशाचे आणि बाहेर पडण्याची दारे शुक्रवारी रात्री 9:00 वाजेपासून शनिवारी सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत बंद करण्यात आली आहेत. नवी दिल्ली मेट्रो स्थानकाचा अपवाद वगळता बाधित सर्व स्थानकांवर इंटरचेंज सुविधा उपलब्ध राहील. याशिवाय जमावबंदी , एकत्र येण्याची ठिकाणे आणि प्रस्तावित निदर्शनाशी संबंधित ऑनलाईन पोस्ट व संदेशांची पोलिस पथके तपासणी करत आहेत.
250 रेल्वे गाड्या रद्द: आल्या मूळ स्थानकांवरून शुक्रवारी (दि.9 ऑक्टोबर) दुपारी 2:00 नंतर सुटणार्या आणि 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 4 जे दुपारी 2 वाजता यादरम्यान नवी दिल्ली किंवा हजरत निजामुद्दीन स्थानकांवर पोहोचणार्या व इतर राज्यांतील विविध स्थानकांतून सुटणार्या 250 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याचे उत्तर रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र सरकारवर सर्वोच्च ताशेरे : सीजेपी आंदोलनामुळे दिल्ली मेट्रो आणि राजधानीकडे येणार्या रेल्वेच्या वाहतुकीवर पूर्णपणे बंदी येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकार आणि अधिकार्यांना दिले, आपण सर्व काही ठप्प करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.
मुंबईतून या गाड्या रद्द : सीजेपीच्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर मुुंबईतून दिल्लीकडे जाणार्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर शुक्रवारी परिणाम झाला.
मध्य रेल्वे: गाडी क्रमांक (22221/2) मुंबई सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन-सीएसएमटी राजधानी एक्सप्रेस रद्द केली आहे.
पश्चिम रेल्वे : मुंबई सेंट्रल-हजरत निजामुद्दीन दुरंतो (22209), (12957) स्वर्ण जयंती रजधानी, (12247) वांद्रे टर्मिनस- हजरत निजामुद्दीन , (20155) डॉ. आंबेडकर नगर -नवी दिल्ली, (12415) इंदोर-नवीदिल्ली या एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल-नवीदिल्ली राजधानी एक्सप्रेस (12951) आणि मुंबई सेंट्रल- हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती रजाधानी एक्सप्रेस (12953) पाच तास उशिराने सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरक्षा जवानांची तैनाती : 25,000 पोलिस, निमलष्करी दलाचे जवान तैनात, 45 दिल्ली मेट्रोची स्थानके बंद, 120+ सीआरपीएफच्या तुकड्या तैनात, 24 तास इंटरनेट सेवा स्थगित
आंदोलक जागो जागी स्थानबद्ध : सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर राजधानी दिल्लीकडे जाणार्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असल्या तरी देशाच्या कानाकोपर्यातून सोईनुसार रेल्वे, वाहनातून दिल्लीकडे कूच करणार्या आंदोलकांना जागोजागाी पोलिसाकंडून स्थानबद्घ करण्यात येत असल्याचं चित्र आहे.
... तर संपूर्ण देशच बंद करून टाका- अभिजीत दिकपे (सीजेपी संस्थापक): सार्वजनिक वाहतूक आणि नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध घालून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारला तरुणांची एवढीच भीती वाटत असेल, तर संपूर्ण देशच बंद करून टाका.



Comments