top of page

जंतर-मंतरवर सीजेपी कार्यकर्त्यांची पोलीसांकडून धरपकड, अभिजीत दिपके, सौरव दास, अशुतोष रांका अटक; अजिंक्य शिंदे यांच्यावर जबाबदारी

10 hours ago
2 min read


मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्ली पोलिसांकडून आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली असली, तरी आंदोलनावर ठाम सीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांना पोलिसांनी विमानतळावरून सकाळीच ताब्यात घेतले. जंतर-मंतरकडे जाणार्‍या शेकडो कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केल्याने आंदोलकांतून पोलिस कारवाईविरोधात संताप व्यक्त करण्यता येत आहे. सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होत हाय कोर्ट व सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलक वकिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आंदोलक वकिलांना सोडण्याचे पोलिसांना आदेश दिले.


कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनावर ठाम आहे.शनिवारी (दि.10) सकाळ पासूनच जंतर-मंतरच्या दिशेने जाणार्‍या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके, अशुतोष रांका, सौरव दास यांना विमान प्रवासातच पोलिसांनी नजरकैद करत दिल्लीतील विमानतळावर त्यांना ताब्यात घेण्यात आले. सीजेपी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड करून त्यांना दिल्लीतील डिटेन्शन सेंटरमध्ये स्थानबद्ध केले. दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या आंदोलनाला परवानगी नाकरली असून आंदोलकांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेत आंदोलनापासून परावृत्त होण्याचे आवाहन केले. मात्र, सीजेपी आंदोलनावर ठाम असल्याने दिल्लीत सुरक्षा यंत्रणेने अतिरिक्त कुमक तैनात केली.


आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर विविध राज्यातून दिल्लीकडे येणार्‍या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. दिल्लीतील 40 मेट्रोस्टेशन बंद करण्यात आले. शिवाय दिल्लीकडे येणार्‍या वाहनांची रात्रीपासूनच कसून तपासणी करण्यात येत होती. पहाटेपासूनच पोलिसांनी आंदोलक सीजेपी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. दरम्यान, सकाळी जंतर-मंतरच्या दिशेने येणार्‍या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड करून त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये स्थानबद्ध केले. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना डिटेन करण्यासाठी 14 ठिकाणी डिटेन्शन सेंटर उघडण्यात आले आहेत. आंदोलकांना ताब्यात घेवून विविध डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले.


आंदोलनासाठी विविध राज्यातून दिल्लीकडे येणार्‍या आंदोलकांना पोलिसांनी ज्या-त्या ठिकाणीच ताब्यात घेतल्याचा आरोप सीजेपीकडून करण्यात आला. सीजेपीच्या आंदोलना सहभागी होण्याचे अवाहन करणार्‍या युट्यूबर ध्रूव राठी यांना शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. आज सकाळी सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके, अशुुतोष रांका, सौरव दास यांना विमान प्रवासात नजरकैद करत दिल्ली विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्लीतील रस्त्यारस्त्यावर आंदोलकांना अक्षरश: उचलबांगडी करून पोलिसांनी वाहनात कोंबल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर पदाधिकारी जंतर-मंतरच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांची उचलबांगडी करून डिटेन केले. ममता बॅनर्जीसह तृनमूल काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनाही दिल्ली पोलिसांनी डिटेन केलं.


दिल्ली पोलिस आंदोलकांना दिसेल तिथे ताब्यात घेवून डिटेन सेंटरमध्ये स्थानबद्ध करत आहेत.

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर भूमिगत असलेल्या ऑल इंडिया स्टूडंट फेडरेशनच्या नेहा बोरा यांनी सकाळी ट्विट करत दिल्ली हार्ट येथे जमा होण्याचे आवाहन करत मोर्चा काढला. अचानक निघालेल्या मोर्चाने पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. नेहा बोरा यांच्यासह मोर्चेकरी आंदोलकांना सफदरजंग येथून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.


दिल्ली हायकोर्टासह सुप्रीम कोर्टांच्या वकिलांनी सीजेपी आंदोलनात सहभागी होत दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध म्हणून मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मोर्चात सहभागी जवळपास 250 ते 300 वकिलांना पोलिसांनी ताब्यात घेवून डिटेन सेंटरमध्ये स्थानबद्ध केले. पोलिसांकडून धक्काबुक्की करत, आरोपींच्या वाहतूकीसाठी वापणार्‍या वाहतून आम्हाला डिटेन सेंटरमध्ये आणल्याचा आरोप आंदोलक वकिलांनी केला. बार कॉन्सील कडून हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली. यावर सुप्रीम कोर्टाने आंदोलक वकिलांना सोडण्याचे पोलिसांना आदेश दिले.दिल्ली पोलिस आणि आंदोलकांमधील संघर्ष चांगलाच पेटला असून दिल्लीत सुरक्षा यंत्रणांकडून आंदोलकांना जागो जागा डिटेन करण्यात येत असल्याने देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे.


अजिंक्य शिंदेकडे आंदोलनाची कमान: अभिजीत दिपके यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकार्‍यांना दिल्ली पोलिसांनी विमानतळावर डिटेन केल्यानंतर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करत आम्हाला डिटेन करण्यात आलं आहे. त्यामुळे यापूढे सीजेपी आंदोलनाचं नेतृत्व अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचं दिपके म्हणाले.


Comments


bottom of page