top of page

पुण्यातील डॉक्टर महिलेचा खळबळजनक दाव्याचा व्हिडिओ; डॉ. गौरीनंतर माझा खून..

ree

पुणे: पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेंची पत्नी डॉ. गौरी गर्जे-पालवे यांच्या आत्महत्यने राज्यभरात खळबळ उडाली. पतीचे अफेयर, सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून गौरीने आत्महत्या केली. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण चर्चेत असतानाच आता पुण्यामधून स्नेहल घुगे या डॉक्टर महिलेचा खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये डॉक्टर गौरी नंतर माझा बळी जाणार आहे असे म्हणत आपबिती सांगितली.


डॉ. स्नेहल घुगे यांचे साडे तीन वर्षापूर्वी रविंद्र महादेव घुगे यांच्याशी लग्न झाले, ते जालन्यातील अंबडचे रहिवासी आहेत. लग्नानंतर पतीचे दोन मुलींशी अफेयर होते, याबबत विचारणा केल्यानंतर मला मारहाण केल्याचा आरापे स्नेहल घुगेंनी केला आहे. तसेच गेल्या 11 महिन्यांपासून पती मारहाण करून फरार झाला आहे. घटस्फोट हवा असल्याने पती माझ्यासोबत राहत नाहीत, जाणून बुजून गायब असल्याचा अरोप स्नेहल घुगेंनी केली आहे.


स्नेहल घुने म्हणाल्या की, नणंद योगिता संजय सानप हिच्याकडून छळ होत आहे. ही आमदार नारायण कुचेंची कार्यकर्ती आहे. ती नारायण कुचेंचे नाव घेऊन वारंवार धमकी देत असते. आम्ही कुचे साहेबांचे नाव सागितले अन् पाच दहा लाख रुपये दिले तर तु कोणतीही केस केलीस तरी आम्ही बाहेर पडू, अशा धमक्या ते देतात.


राजकीय कनेक्शन असल्याने पोलिस प्रशासनही मदत करत नाही. आम्ही संरक्षण देणार नाही, तक्रारही दाखल करून घेणार नाही, तुम्ही लोकांच्या घरात घुसाल तर मार खाण्याची तयारी ठेव, असे उत्तर पेालिस अधिक्षकांनी दिल्याचाही आरोप स्नेहल घुगेंनी केला आहे. तसेच पोलिसांसमोर माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला. असा आरोपही त्यांनी व्हिडिओमध्ये केला आहे.


स्नेहल घुगे पुढे म्हणाल्या की, याबाबत मी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनाही सांगितले, मात्र नारायण कचेंचे नाव असल्याने त्यांनी मदत करण्यास टाळाटाळ केली. तु घटस्फोट घेऊन मोकळी हो, असा सल्ला त्यांनी दिला. मी अत्महत्या करणार नाही. माझा फक्त खून होऊ शकतो. तसं काही झाल्यास माझी सासरची मंडळी जबाबदार असतील असंही या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, भाजप आमदार नारायण कुचेंनी स्नेहल घुगेंचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी संबंधित महिलेला आणि तिच्या पतीला ओळखत नाही, असे स्पष्टीकरण आमदार नारायण कुचेंनी दिले आहे.

Comments


bottom of page