पुण्यातील नामांकित हॉस्पीटलमध्ये ‘टायमर’ सेट केलेला जिवंत बॉम्ब? पोलिसांनी केला काही मिनिटांतच परिसर सील
- Navnath Yewale
- May 14
- 1 min read

पुणे : पुणे शहरातील हडपसरमधील कामधेनु इस्टेट परिसरात असलेल्या एका नामांकित सुपर स्पेशालिस्ट खासगी रुग्णालयात बुधवारी (ता.13) दुपरारी जिवंत बॉम्ब आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली. या घटनेमुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि परिसरात राहणार्या नारिकांमध्ये भीतीमध्ये वातावरण पसरले होते. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने तब्बल सात तास या वस्तूची तपासणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
मिळालेल्या महितीनुसार, पुण्यातील हडपसर येथील रुग्णालयातील एका टॉयलेटमध्ये ही संशयास्पद वस्तू आढळून आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. बीडीएस पथकाने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयातील हालचालींवर मर्यादा आणण्यात आल्या होत्या पथकाने अत्यंत सावधगिरीने या वस्तूची सात तास तपासणी केली आणि त्यानंतर ती सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली.
मोठ्या आणि गजबजलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये ही वस्तू आलीच कशी? रुग्णालयाची सुरक्षा यंत्रणा नक्की काय करत होती? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. दररोज हजारो लोकांची ये-जा असणार्या ठिकाणी अशा प्रकारची वस्तू अढळणे, हे मोठ्या सुरक्षा त्रुटीकडे बोट दाखवणारे आहे.
दरम्यान, ही वस्तु नेमकी कोणी आणि कोणतय हेतूने ठेवली, याबाबत परिसरात उलटसूलट चर्चा सुरू आहेत. उपचाराचे अवाढव्य बिल, रुग्णाच्या नातेवाईकाचा असलेला राग किंवा आर्थिक़ व्यवहरातून कोणाचे तरी हे कृत्य आहे का? अशा चर्चांना उधान आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. तांत्रिक तपास आणि रुग्णालयात येणार्या-जाणार्या व्यक्तींच्या नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही वस्तू नेमकी काय होती आणितो खरोखरच बॉम्ब होता हा, याबाबतचा अधिकृत अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहे. मात्र, या घटनेने पुणे शहरात पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.



Comments