top of page

पैठण- पंढरपूर पालखी मार्ग: कंत्राटदार कंपनीच्या भल्यासाठी शाश्वत विकासाला सुरुंग!

निमुळत्या रस्त्याचा हट्ट कोणाचा?; हद्द 30 मिटर काम प्रत्यक्षात 22.5 मिटरचे


बीड: शिरुर शहर हद्दीत सुरू असलेले पैठण- पंढरपूर पालखी मार्गाची शहरीभागातील हद्द सोडून निमुळत्या रस्त्याचा घाट कोणी घातला? प्रत्यक्षात रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाल्यांचा व्यास चार मिटर सांगण्यात येत असला तरी एका नालीचा व्यास केवळ 1.25 प्रमाणे 2.5 मिटर एवढा आहे. त्यामुळे कंत्राटदार कंपणीच्या भल्यासाठी प्रदिर्घ आणि शाश्वत विकाला सुरुंग लावणारे अदृष्य हात कोणाचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


महामार्ग, राज्यमार्गांची कामांचे अंदाजपत्रक संभाव्य काळातील किमान 25 वर्षाच्या कालावधीतील वाहतूक, वरदळ आणि रहदारीच्या विचाराधीन राहूनच तयार करण्यात येते. अंदाजपत्रकानुसार कुठल्याही ट्रक्चरचे अयुष्यमान 100 वर्षाचे असले तरी व्यास्तारीत कामासाठी त्या ट्रक्चरची दुरुस्ती करण्यात येते. राष्ट्रीय महामार्ग असो किंवा राज्य मार्ग शहरीभागात त्याची हद्द कायम करून किमान दुभाजकासह रस्त्याचे काम अनिवार्य आहे. शिरुर शहरात मात्र प्रगतीपथावर असलेल्या पैठण- पंढरपूर पालखी मार्गाच्या कामात प्रत्यक्ष अंदाजपत्रकाला तिलांजली देत कंत्राटदार कंपनीकडून थातूर-मातूर कामाचा सपाटा लावण्यात आला आहे.


विशेष म्हणजे याच मार्गावरून किमान 600 मिटर राजूरी(नवगन)-चिंचपूर मार्गाचीही वाहतूक आहे. दोन्ही मार्ग एकत्रितरित्या शहरातून मार्गस्थ होत असल्याने नियोजीत रस्त्याच्या मजबुतीकरणाची हद्द किामन 30 मिटर आवश्यक आहे. मात्र कंत्राटदार कंपणी, सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग संभाजीनगर) च्या संगणमताने कंत्रटादर कंपनीच्या भल्यासाठी केवळ 20 मिटर निव्वळ रस्ता मजबुतीकरणाचे काम करण्यात येत आहे.


नाली कामातही कंत्राटदार कंपनी आणि प्रशासनात विसंगती दिसून येत असून प्रशासनाकडून दोन्ही 4 मिटर नाल्याचा व्यास (रुंदी) सांगण्यात येत असला तरी प्रत्यक्षात मात्र प्रती नाली 1.25 प्रमाणे केवळ 2.5 मिटर एवढा आहे. उर्वरित दिड मिटर रस्त्याचे काम कमी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समान्य नागरिकांच्याही नजरेतून झाकू शकत नाही.


प्रत्यक्षात कंत्राटदार कंपनीकडून चक्क दीड मिटर म्हणजे जवळपास 5 फूट काम कमी करण्यात आल्याचे वास्तव नाकारता येऊ शकत नाही. नियोजीत 20 मिटरच्या कामात किमान एक मिटर दुभाजक समाविष्ट केल्यास केवळ 19 मिटरचा मुख्य मार्ग राहणार आहे. बीड-आहिल्यानगर, पैठण -पंढरपूर या दोन्ही मार्गाची वाहतूक शहरीकरणातून याच मार्गावरुन होणार आहेत त्यामुळे संभाव्य काळात जिजामाता चौक ते प्राथमिक आरोग्य केंद्र हा 600 मिटरचा मार्ग वाहतूकीसाठी ‘मौत कुआ’ होणार आहे.


नगरपंचायत अनभिज्ञ : सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवून दिलेल्या हद्दीनुसार नगरपंचायतीकडून इमारत बांधकामांसाठी परवाने दिले जातात. येने, लेआऊट मध्ये स्पष्ट मार्गाच्या हद्दीचा उल्लेख अनिवार्य आहे आणि तो नगररचनाकार यांना करावाच लागतो. मात्र याबाबत नगरपंचायतीकडे विचारणा केली असता आमच्याकडे त्याचं काहीच नाही असे उत्तर मिळाले.


अदृष्य हात कोणाचे? : शहरीभागातून मार्गस्थ होणार्‍या पालखीमार्ग व राज्यमार्ग एकत्रित दोन्ही मार्गाच्या कामाची हद्द सोडून निमुळत्या रस्ता कामाचा हट्ट कोणाचा? पायाभूत सुविधांच्या शाश्वत विकासाला सुरंग लावण्याच हट्ट का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.


हद्दीत अतिक्रमणाला प्रोत्साहन : सार्वजनिक बांधकाम विभागाची 30 मिटर हद्द कायम करण्यात आली आहे. कंत्राटदार कंपनीकडून प्रत्यक्षात केवळ 22.5 मिटर (नाल्यासह) मार्गाचे काम सुरू आहे उर्वरित 7.5 मिटरच्या हद्दीत अतिक्रमणाला प्रशासनाकडूनच प्रोत्साहन दिले जात असल्याचे चित्र आहे.

Comments


bottom of page