पैठण-पंढरपूर पालखी मार्गाला शहरीभागातच हद्दीचे ग्रहण!
- Navnath Yewale
- 17 hours ago
- 2 min read
निमुळत्या रस्त्यावरून होणार दोन मार्गाची वाहतूक; संभाव्य वाहतूक कोंडीचा प्राधिकरणाला विसर

बीड :पैठण- पंढरपूर पालखी मार्गाचे गेल्या पाच वर्षापासून प्रगतीपथावर आहे. पैठण-पंढरपूर मार्ग व राजूरी नवगन-चिंचपूर मार्ग शिरुर कासार शहरातून जवळपास 600 मिटर अंतरावरून एकत्रित मार्गस्थ होत आहे. शहरीभागात या मार्गाचे काम केवळ 20 मिटरच्या हद्दीपर्यंत मजबुतीकरण प्रगतीपथावर आहे. जबाबदार प्रशासन व कंत्राटदार कंपनीच्या संगनमताने ठरवून नियोजीत मार्गावर कायम वाहतूक कोंडी, अपघाताला निमंत्रण दिले जात असल्याने पालखी मार्गाच्या हद्दीला शहरातच ग्रहण लागल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
राज्यातील दोन तिर्थक्षेत्रांना जोडणार्या पैठण- पंढरपूर पालखी मार्गाचे काम गेल्या एक तपा पासून प्रगती पथावर आहे. दरवर्षी टप्प्या-टप्प्याने धिम्या गतीने सुरू असलेल्या कामाच्या कंत्राटदार कंपन्या सातत्याने बदलत आहेत. पालखी मार्गाच्या पूर्णत्वासाठी पंढरपूर पासून पैठणपर्यंत वारकरी, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थांनी सातत्याने आंदोलन, मोर्चे, रास्ता रोकोंसह अनोखे आंदोलनं करून प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रत्येकवेळी आंदोलकांना जबाबदार प्रशानाला मागणी कळवण्याचे अश्वासन मिळाले. पण पदरी कायम निराशाच आली.
राज्याच्या पाच जिल्ह्यातून मार्गस्थ होत असलेल्या पैठण- पंढरपूर पालखी मार्गाच्या सभोवतालच्या शहरांसह गावखेड्यातील नागरिकांना जीव मूठीत घेवून वाहतूक करावी लागते, जागोजाग खोदाई, भराव आणि सिंगल पट्ट्याच्या काँक्रेटीकरणामुळे कित्तेक वाहन चालकांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात झाले तर दुचाकीस्वारांचा अपघातामध्ये जीव गेला. अपघात झाला की, नागरिकांनी आंदोलन छेडावे, स्थानिक प्रशासनाने ठरल्याप्रमाणे ‘मागण्या कळवण्याचे लेखी अश्वासनावर आंदोलनकर्त्यांची बोळवन करावी, या सूत्र ठरलेलंच’ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आहिल्यानगर जिल्ह्यात आणि त्यानंतर बीड जिल्ह्यात प्रवेशीत होत असलेल्या पालखी मार्गाचे शिरुर कासार तालुक्यात दहिवंडी शिवारात अर्धवट आहे. शहरानजीक सिंदफणा नदीपात्रतून पूरनियंत्रण रेषेची हद्दच मार्गाने व्यापली आहे. उत्तमनगर मार्गे प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंतचा टप्पाही अर्धवट आहे.
दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्र ते शहरातील जिजामाता चौक, सिंदफणा कॅनल पर्यंत पालखी मार्ग व राजूरी (नवगन)- चिंचपूर मार्ग एकत्रितपणे मार्गस्थ होत आहे. शहरीभागातून दोन्ही मार्ग एकत्रित होत असल्याने रस्त्याची रुंदी संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता किमान 36 मिटर असणे आवश्यक आहे. सध्या वाहतूकीची वर्दळ पाहता अपघात टाळण्यासाठी किमान शहरी भागात पुरता डिव्हायडरयुक्त महामार्ग अत्यावश्यक आहे. मात्र, जबाबदार प्रशासन व कंत्राटदार कंपनीच्या संगणमताने चक्क शहरी भागात केवळ 24 मिटर नाल्यासह व 20 मिटर (65 फूट) नाल्या वगळता नियोजीत मजबुतीकरण करण्यात येत असल्याने पालखी मार्गाला शहरतच हद्दीचे ग्रहण लागल्याच्या भावना वारकरी, ग्रामस्थ नागरीकांतून व्यक्त होत आहेत.
रस्ता हद्द 30 मिटरची : पालखी मार्ग रस्त्याची हद्द 30 मिटर आहे. इंस्टीमेंटनूसार जेवढी हद्द असेल तेवढे काम करण्यात येत असेल. कंपनीच्या नियमप्रमाणे काम सुरू असेल त्यामुळे आमची हद्द ही 30 मिटर अथवा कितीही असली तरी जेवढे इंस्टीमेंटमध्ये आहे तेवढे काम सुरू असेल.
गजानन सितलांबे (अभियंता राष्ट्रीय महामार्ग, छत्रपती संभाजीनगर)
पीडब्ल्यूडीकडेच सर्व माहिती : रस्ता हद्द व मार्गाच्या कामाची माहिती सर्व माहिती सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग छत्रपती संभाजीनगर विभाग (पीडब्ल्यूडी) कडेच उपलब्ध आहे.
ब्रम्हय्या (प्रोजेक्ट मॅनेजर)



Comments