प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये प्रकाश निकम यांचा भाजपात प्रवेश
- Navnath Yewale
- 8 hours ago
- 1 min read

मोखाडा : पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते प्रकाश निकम यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.हा पक्षप्रवेश मुंबई येथील भाजप प्रदेशाध्यक्ष कार्यालयात पार पडला,ज्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,जिल्हाध्यक्ष भरत राजपूत,भाजपचे वरिष्ठ नेते बाबाजी काठोळे मोखाड्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते रघुवीर डिंगोरे, जयराम निसाळ उपस्थित होते तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रकाश निकम याच्यासोबत मोखाडा तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच,सदस्य,पंचायत समिती सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपात सामील झाले. यावेळी हजारो समर्थक,भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजर होते.
पालघरमधील राजकीय वातावरण पाहता,हा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.काही कालावधीत शिवसेना शिंदे गटातील बंडखोरी नंतर काही तणाव आणि नाराजीमुळे प्रकाश निकम यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे असे समजते विशेषतःपक्षावर गद्दाराचं वर्तन करणाऱ्या काही नेत्यांना शिंदे गटात स्थान दिल्यामुळे निकम यांची नाराजी झाल्यामुळे व निकम यांचा पालघर जिल्ह्यात राजकारणात मोठा दबदबा असून,त्यांचा भाजपमध्ये प्रवेश म्हणजे आगामी निवडणुकांसाठी भाजपला महत्त्वाचा फायदा होणार असल्याचे विश्लेषण केले जात आहे.
मोखाडा येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा,व समर्थकांचा मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश झाल्याने भाजपच्या स्थानिक संघटनेला अधिक बळकटी मिळणार आहे.तसेच, युवा सेना जिल्हाप्रमुख राकेश रत्नाकर,चंद्रकांत रंधा देखील यावेळी भाजपात सामील झाले आहेत.यामुळे पालघर जिल्ह्यातील पक्षीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रकाश निकम यांचे भाजपात स्वागत करताना म्हटले की, "आपल्या अनुभवी नेतृत्वाचा भाजपला मोठा उपयोग होणार आहे. आगामी काळात पालघर जिल्ह्यात भाजपची अधिक ताकद वाढेल, याची खात्री आहे." यावेळी सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी,पदाधिकाऱ्यांनी देखील निकम यांचे स्वागत केले आणि पक्षाच्या एकात्मतेवर भर दिला. या पक्षप्रवेशामुळे पालघर जिल्ह्यातील राजकीय रणनितीत वेगळीच गती येणार आहे व इतर पक्षासाठी हे मोठे आव्हान ठरणार आहे.तसेच,हा बदल आगामी स्थानिक आणि निवडणुकांमध्ये महत्त्वाचा ठरणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
Comments