top of page

प्रोजेक्ट 18: 144 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेले, विनाशक शत्रूच्या नौदलाचा करेल नाश !

ree

भारत आपल्या नौदलाला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी एका नवीन प्रकल्पावर काम करत आहे. ज्याला प्रोजेक्ट 18 (पी-18) असे म्हटले जात आहे. हे पुढील पिढीचे विनाशक असेल, जे ब्रम्होस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रासह 144 क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम असेल. ते 500 किलोमिटर अंतरावरून शत्रूंचा मागोवा घेण्यास सक्षम असेल. प्रोजेक्ट 18 भारतीय नौदलाला नवीन उंची देईल हे स्वावलंबन आणि सुरक्षेचे मिश्रण आहे, ज्यामुळे हिंदी महासागरात भारताची ताकद वाढेल. ते तयार करण्यासाठी आणि मेहनत लागेल, परंतु यशासह भारत समुद्रात आघाडीवर येऊ शकतो.


प्रोजेक्ट 18 ही भारतीय नौदलाची एक नवीन आणि आधुनिक युद्धनौका आहे, जी वॉरशिप डिझाइन ब्युरो ने डिझाइन केली आहे. ती सध्याच्या विशाखापट्टणम- क्लास डिस्ट्रॉयर्सपेक्षा खूपच मोठी आणि अधिक शक्तिशाली असेल. त्याचे वजन सुमारे 13,000 टन असेल, ज्यामुळे ते भारताताील सर्वात मोठे नौदल गस्त जहाज बनेल. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, याला क्रूझर म्हणून देखील वर्गीकृत केले जाऊ शकते, कारण 10,000 टनांपेक्षा जास्त वजनाच्या जहाजांना क्रूझर म्हणतात. हे डिस्ट्रॉयटर पूर्णपणे स्लिल्थ (लपविण्याची क्षमता) ने सुसज्ज असेल, म्हणजेच शत्रूच्या रडारवरून ते सहजपणे पकडणे कठीण होईल. त्याची रचना 2023 मध्ये सुरू करणत आली येत्या 5 ते 10 वर्षात ते तयार होऊ शकते.


प्रोजेक्ट 18 चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे 144 व्हर्टिकल लाँच सिस्टम सेल्स. हे सेल्स वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेपणास्त्रांना लाँच करण्यासाठी आहेत, ज्यामुळे ते बहुउद्देशीय बनते. या क्षेपणास्तांमध्ये हे समाविष्ठ आहे.

दरम्यान ,48 सेलमध्ये ब्रम्होस एक्सटेंडेड-रेंज सुरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आणि स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्र असेल. ही क्षेपणास्त्र शत्रूच्या जहाजांना आणि जमिनीला लक्ष्य करू शकतात. 32 सेलमध्ये हवाई हल्ल्यांपासून आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपासून संरक्षण करण्यासाठी ही क्षेपणास्त्रे असतील. त्यांची रेंज 250 किमी पर्यंत आहे. 64 सेलमध्ये जवळच्या हवेत आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही क्षेपणास्त्रे असतील. 8 स्लँट लाँचर्समध्ये येणारे हे क्षेपणास्त्र अद्याप विकासाच्या टप्यात आहे, परंतु ते वेगवान आणि अधिक धोकादायक असेल. इतक्या क्षेपणास्त्रांसह, हे जहाज एकाचे वेळी अनेक प्रकारच्या धोक्यांना तोंड देऊ शकते-हवा, समुद्र आणि जमीन.


हे डिस्ट्रॉय 4 प्रगत अ‍ॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन केलेले अ‍ॅरे रडारने सुसज्ज असेल, जे डीआरडीओ आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांनी संयुक्तपणे विकसित केले आहेत हे रडार 360 अंश देखरेख प्रदान करेल, म्हणजेच प्रत्येक दिशेने धोका पाहण्यास सक्षम असेल. 500 किलोमिटरपर्यंत, हवाई आणि समुद्री लक्ष्यांचा मागोवा घेण्यास सक्षम असेल, यात एस- बँड रडार, व्हॉल्यूम सर्च रडार आणि मल्टी-सेन्सर मास्ट असेल, जे कठीण वातावरणातही काम करेल. हे रडार केवळ शत्रू शोधणार नाही, तर अचूक लक्ष्यीयकरण करण्यात देखील मतद करतील.


प्रकल्प 18 मध्ये 75% पेक्षा स्वदेशी तंत्रज्ञान असेल, जे ‘ आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाचा भाग आहे. ज्यामध्ये स्वदेशी क्षेपणास्त्रे आणि रडार, एकात्मिक इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टम, जे जहाज जलद आणि शांतपणे चालवेल. दोन बहु - भूमिका असलेले हेलिकॉप्टर (जसे की एचएएल धु्रव) आणि स्वायत्त पाण्याखालल ड्रोन, जे पाणबुडीविरोधात युद्धात मतद करतील हे जाहज केवह शक्तिशाली नाही, तर भारताची तांत्रिक क्षमता देखील दर्शवेल.


डिझाइन 2028 पर्यंत अंतिम केले जाऊ शकते. बांंधकाम 2030-2035 दरम्यान पूर्ण होईल. ते माझगाव डॉक आणि गार्डन रीच शिपबिल्डर्सद्वारे बांधले जाईल. भारत 2035 पर्यंत आपल्या नौदलाची संख्या 170-175 जहाजापर्यंत, नेऊ इच्छितो. प्रकल्प 18 हा त्याचा कणा असेल. हे जहाज चीनच्या वाढत्या नौदल शक्तीला आणि हिंदी महासागरातील आव्हानांना प्रतिसाद देईल. हे भारताच्या सागरी सीमांचे संरक्षण मजबूत करेल. ते एक प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयास येईल.


Comments


bottom of page