... बघा मराठ्यांनो, मराठ्यांनी सावध होणे गरजेचे - जरांगे पाटील
- Navnath Yewale
- Sep 11
- 1 min read

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारने काढलेल्या हैदराबाद गॅझेटिअरच्या जीआर ला ओबीसी संघटना, नेत्यांकडून विरोध होत आहे. सरकारच्या ओबीसी समितीच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध करत कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांच्या मागणीनंतर जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, त्या काय म्हटल्या हे ऐकले नाही. पंकजा मुंडे काय म्हटल्या काय नाही, हे मी —ऐकलं नाही, मला नाही वाटत त्या अशा बोलल्या असतील आणि बोलल्याच असतील तर मराठ्यांनी सावध होणे गरजेचे आहे. बघा मराठ्यांनो... ज्याचं राजकीय करिअर मोठं करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात. तेच माणसं आपल्या लेकरा बाळांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले, त्या प्रमाणपत्रावर आणि त्याच मराठ्यांच्याा लेकरांच्या मुळावर घाव घालण्याचे काम करत असतील तर मग अवघड आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. मराठवाड्यातील मराठ्यांनी आणि बीड जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी विचार करणे गरजेचे आहे. तुमच्यासाठी जात महत्वाची आहे. जीआर टिकवणे महत्वाचे आहे, असे अवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
जरांगे पाटलांची छगन भुजबळांवर टीका
ओबीसी उपसमितीच्या बैठकीत छगन भुजबळ हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. याबाबत जरांगे पाटील म्हणाले की, मराठे सरकारच्या बाजूने राहतात. सरकार देखील मराठ्यांच्या बाजूने काम करते हे त्याला (भुजबळ) नको आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हा डाव लक्षात आला आहे, हा फक्त याच्या स्वार्थासाठी ओबीसी-ओबीसी करतो. आमच्या जीआरला काही होऊ शकत नाही. जीआरला फेरफार केली तर आम्ही करोटच्या संख्येने मराठे रस्त्यावर दिसणार, असा इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिला आहे.



Comments