top of page

बऱ्हाणपूर–आंबेदा येथे दुर्गामातेचे जल्लोषात आगमन, ग्रामस्थांच्या एकतेतून दुर्गोत्सवाला नवी ऊर्जा

ree

डहाणू : बऱ्हाणपूर–आंबेदा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गामातेचे मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. सजवलेल्या मंडपात देवीची मूर्ती आणून गुरुजी अमोल पुंजारा यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठापना विधी पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय आणि मंगलमय वातावरणाने भरून गेला.


गेल्या १३ वर्षांपासून ग्रामस्थ एकत्र येऊन दुर्गामातेची प्राणप्रतिष्ठापना करीत असून या काळात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. महिलांसाठी संगीत खुर्ची, खेळ पैठणी यांसारखे मनोरंजक उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतून गावातील ऐक्य व आपुलकी दृढ केली जाते.


या उत्सवाला दरवर्षी आदिवासी नेते व शिवसेना (शिंदे गट) चे उपनेते मा. जगदीश धोडी तसेच कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभते. महिलांना साडी, लुगडे व कपडे वाटप करून मार्गदर्शन केले जाते.


मंडळाचे अशोक वरठा, महादु वरठा, नरेश वरठा, दत्तु भोये, राजेश पऱ्हाड, रुतिक वरठा, भरत वरठा, संदेश गडग, रामश्री, राहूल, गोविंद गुहे, संजय सापटा, सचिन तुंबडा, स्वप्नील वरठा, मिना वरठा, सुरज कौले, ममता, अश्विनी, रंजना पऱ्हाड, सुरेखा, सुरेश, भाग्यश्री, प्रतिभा, सुरेश घोषे यांसह गावातील असंख्य ग्रामस्थांच्या अथक परिश्रमामुळे हा उत्सव यशस्वीपणे पार पडतो. ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे दुर्गोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक भान जागवणारा आणि गावाच्या उर्जेला नवी दिशा देणारा ठरतो.

Comments


bottom of page