बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमधून हाकलून देऊ, ममता बॅनर्जी त्यांना वाचवू शकणार नाहीत- पंतप्रधान मोदी
- Navnath Yewale
- 19 hours ago
- 1 min read

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला. बनगाव येथील सभेत बोलताना त्यांनी घुसखोरांना थेट इशारा देत ‘ 29एप्रिलपूर्वी बंगाल सोडा, अन्यथा 4 मे नंतर कारवाई होईल’ असा स्पष्ट इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या सभेनंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेस यसांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर घुसखोरांना आश्रय दिल्याचा आरोप केला. भाजप सत्तेत आल्यानंतर प्रत्येक घुसखोराला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मतुुआ-नामशूद्र आणि इतर शरणार्थी कुटुंबांना नागरिकत्व, पत्ता आणि सर्व हक्क देण्याची हमी मोदी यांनी दिली. ही मोदींची गॅरंटी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मोदी यांनी महिलांसाठी मोठी घोषणा करत सांगितले की, भाजप सरकार आल्यास दरवर्षी 36,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जातील. तसेच अंगणवाडी आणि महिला आरोग्य कर्मचार्यांच्या वेतनातही सुधारणा केली जाईल.
भाजपने बंगालमध्ये मुलींना सरकारी नोकर्यांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्याचे अश्वासन दिले आहे. यामुळे महिलांना दुहेरी लाभ मिळे, असे मोदी यांनी सांगितले. मोदी यांनी आपल्या भाषणात ममता बॅनर्जी सरकारवर तीव्र टीका करत बंगालमध्ये बदलाची गरज असल्याचे सांगितले. आगामी निवडणुकांमध्ये जनतेने भाजपला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.



Comments