top of page

बागेश्वर बाबांचा माफीनामा; भावना दुखावल्यास माफी मागतो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यावरुन मागीतली माफी

सध्या देशभरात बागेश्वर बाबांच्या छत्रपती शिवरायांबद्दलच्या विधयानावरुन संताप व्यक्त होत आहे. शिवरांयाबद्दल अवमानकारक, वादग्रस्त विधान केल्याने बागेश्वर यांच्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. संतापजनक विधानावर आता बागेश्वर बाबांनी आजा जाहीर माफी मागितली आहे.


नागपूर येथे भारतदुर्गा मंदिराच्चया शिलान्यास कार्यक्रमावेळी बागेश्वर बाबांच्या वक्तव्यांनं राज्यभरात संतापची लाट पसरली. छत्रपती शिवाजी महाराज युद्धाच्या वेळी थकल्यावर समर्थ रामदासाकडे जाऊन म्हणाले की आपण खूप युद्ध लढलो आता हे राज्य तुम्ही सांभाळा..काही दिवस मला काहीच करण्याची इच्छा नाही, असं बोगश्वर बाबा म्हणाले. ज्यावर राज्यभरातील शिवप्रेमींनी तीव्र संताप क्यक्त करत बागेश्वर बाबांना धडा शिवकण्याचा इशारा दिला होता. शिवाय राजकीय नेत्यांकडूनही नाराजी सूर आवळण्यात आला. आमदार रोहित पवार यांनी भोंदू बागेश्वर बाबाला कायम महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी करत, व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासह आरएसएसचे अध्यक्ष मोहन भागवत यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती असताना त्याचवेळेस बागेश्वर बाबा यांचे शिवछत्रपतीं बद्दलचे वादग्रस्त विधान खोडण्याची तसदी घेण्यात आली नाही, असा आरोप करत आमदार पवार यांनी सरकारवर निशाना साधला.


काय होता,बागेश्वर बाबांचा दावा: ‘शिवबांच्या बोलण्यानंतर स्मित करत समर्थ रामदास म्हणाले ठिक आहे, आम्हाला स्वीकार आहे. पण तुम्ही आमचे कोण आहात? यावर उत्तर देत शिवबांनी आपण त्यांचे शिष्य असल्याचं म्हटलं. त्यावर रामसादासांनी प्रश्न केला, शिष्याचं कर्तव्य काय? गुरूच्या आज्ञेचं पालन करणं असं उत्तर शिवाजी महाराजांनी दिलं. ज्यानंतर रामसदासांनी महाराजांनी त्यानां सोपवलेलं मुटूट महराजांच्या डोक्यावर ठेवलं आणि आपण राज्य चालवू मात्र त्याचं संचालन तुम्ही करायचं असं सांगितलं, असा दावा बागेश्वर यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमादरम्यान धर्मसभेचं अयोजन करण्यात आलं होतं. या साहेळ्यासाठी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, बागेश्वर धाम धीरेंद्र कृष्ण शास्त्री, स्वामी अवदधेशानंद गिरीजी महाराज, गुरुशरणानंद महाराज, मित्रानंदजी महाराज, साध्वी ऋतंभरा यांचीही उपस्थिती होती.


बागेश्वर बाबांचा माफीनामा: कालपासून सोशल मीडियावर माझे विधान वेगळ्या पद्धतीने घेतले. आम्ही ज्यांच्याकडे पाहून हिंदू राष्ट्राची संकल्पना केली. आम्ही त्यांचा अपमान करू शकत नाही. स्वप्नातही याचा विचार करू शकत नाही. देशातील हिंदू आज जिवंत आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे. मराठा साम्राज्य हे आपलेच आहेत. आम्ही सर्व छत्रपतींना मानतो. एक टक्केदेखील माझं अपमान करण्याचा विचार नव्हता. माझं बोलणं गुरुंचा महिमा सांगणारे होते. छत्रपती संत महंतांना किती मानायचे हे मला सांगायचे होते. आम्ही हिंदू राष्ट्राची विचारधारा त्यांच्याकडूनच घेतली आहे. साधू कोणाची निंदा करु शकत नाही. ज्यांची वीरता पाहून आम्ही आमचे चारित्र्य घडवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा अवमान होऊ शकत नाही, असे बागेश्वर बाबांनी म्हटले. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो असेही ते म्हणाले.

Comments


bottom of page