top of page

बिहार निवडणुक निकालाचे पडसाद : अखेर काँग्रेसची शरद पवार, उद्धव ठाकर गटाशी फारकत, ..मुंबई महापालिका स्वबळावर लढणार !

ree

बिहार निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. ज्या जागा निवडून आल्या. त्यासाठी मोठी कसरत आणि संघर्ष करावा लागला. आता या पराभवावर सकाळी सकाळी दिल्लीत बैठक घेत काँग्रेसने मंथन केले आणि महाराष्ट्रात त्याचे धक्के जाणवायला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला पहिला मोठा झटका दिला आहे. हा बिहार निवडणुकीचा साईड इफेक्ट तर नाही ना अशी चर्चा रंगली आहे.


काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्योच काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी जाहीर केले. मुंबई महाविकास आघाडी अथवा इतर कोणासोबत जाणार नसल्याची घोषणा त्यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या एकदिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चेन्नीथला काँग्रेसची कार्यकर्त्यांची भूमिका आहे की वेगळं लढावं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यात स्थानिक नेत्यांची बाजू ऐकून घ्यावी लागेल, अशी भूमिका घेतली.


वर्षा गायकवाड यांच्यावर कोणही नाराज नाही. सर्वजण सोबत आहेत. निवडणुक आयोगाने बिहारची निवडणुक जिंकून दिली हे सर्वांना माहित आहे, महाराष्ट्रात ही असंच झालं, असा आरोप त्यांनी केला. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे असा निर्णय घेतला का या प्रश्नावर दोन ठाकरे एकत्र आल्याने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीपासूनच कार्यकर्त्यांची तशी इच्छा असल्याचे ते म्हणाले.


मुंबई पालिका निवडणुक स्वबळावर लढणार असल्याचे रमेश चेन्नीथला यांनी जाहीर केले. 227 जागांवर लढणार असल्याचे ते म्हणाले. सर्व पदाधिाकरी, कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्ता सांगणार तेच करावं लागणार. काँग्रेसला मजबूत बनवण्याचं आमचं काम आहे. कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.


तर पक्षात स्थानिक पातळीवर कुठलीही नाराजी नाही. सगळे दक दिलाने लढणार असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसची ही भूमिका मुंबई महापालिकापुरतीच असेल की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही ते अशीच भूमिका घेतील, यावर महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून असेल. काँग्रेस बाजूला झाल्यावर मनसे- उद्धवसेना यांची युती मुंबई महापालिकेसाठी रान उठवण्याची शक्यता आहे. बिहार निवडणुकीवरून मित्रपक्षच काँग्रेसवर हल्ला चढवताना दिसत आहेत.

Comments


bottom of page