top of page

बिहारमध्ये भाजप- जेडीयूच्या सत्ता समीकरणात महाराष्ट्रासारचा येणार ट्विस्ट

ree

पटणा: नितीश कुमार एकदा बिहारचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. कारण बिहारमध्ये भाजपनंतर जेडीयू हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत 7 वेळा मुख्यमंत्रीपद भुषवलेले नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार का? हे पाहावं लागणार आहे.


बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं त्यांच्या राजकीय विरोधकांना चारीमुंड्या चित्त केलं आहे. ऐतिहासिक बहुमत मिळवत भाजप आणि जेडीयूनं बिहारमध्ये विजयाचा गुलाल उधळला आहे. बिहार निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी नितीश कुमारांची देखील बिहारमध्ये जादू पाहायला मिळाली आहे. भाजपपाठोपाठ नितीश कुमारांचा जेडीयू दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.


बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजप नंबर वन पक्षा झाला आहे. त्यामुळे बिहारमध्ये एनडीए प्रचंड विजयासह सरकार स्थापनेकडे वाटचाल करत आहेत. समोर येणारे ट्रेंड हे राज्याच्या राजकारणात भाजपसाठी एक अतिशय सकारात्मक संकेत मानले जात आहे. नितीश कुमार यांचा जेडीयू तीन दशकांहून अधिक काळ बिहारमध्येे भाजपचा मित्रपक्ष आहे. पण, नितीश कुमार यांनी कधीकधी पाठ फिरवून पक्षाला अडचणीत देखील आणलं आहे. पण जर अंतिम निकाल यावेळी निवडणुकीच्या ट्रेंडशी सुसंगत राहिला, तर नितीश कुमार भाजपला सोडले तरी बिहारमध्ये त्यांना आव्हान देऊ शकणार नाहीत.


गेल्या चार निवडणुकांमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री बनले आहेत. जेव्हा जेव्हा जेडीयूने कमी जागा जिंकल्या आहेत, तेव्हा सरकारमध्ये भाजपचे वर्चस्व वाढले आहेत. तर गेल्या 25 वर्षात तिसर्‍यांदा भाजप एनडीएमध्ये सर्वात मोठा पक्ष बनला तर आहेच, जर जेडीयूशिवायही, ते एनडीएच्या इतर मित्रपक्षांसह जादूचा आकडा ओलांडत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नितीश कुमार यांना बिहारमध्ये भाजपसोबत कोणत्याही प्रकारच्या कारारावर वाटाघाटी करणे कठीण होते.


भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने वारंवार सांगितलं आहे की, निवडणुकीचे निकाल काहीही असोत, नितीश कुमार हे आघाडीचा चेहरा राहणार आहे. जेडीयूनेही पुन्हा सांगितलं आहे की, नितीश कुमार मुख्यमंत्री असणार आहे. पण, वस्तुस्थिती अशी आहे की 2020 च्या तुलनेत जवळजवळ दुप्पट जागा जिंकूनही, सत्तेची गती पूर्णपणे जेडीयूकडून भाजपकडे सरकल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार यांची स्थिती महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सारखी होईल का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Comments


bottom of page